धक्कादायक! निवडणुकीसाठी 10 लाख घेऊन ये म्हणत छळ, विवाहितेचं टोकाचं पाऊल; कोल्हापुरात खळबळ
कोल्हापूर : राज्यात एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे (Election) वातावरण तापलं असताना, दुसरीकडे मंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहायकाच्या पत्नीने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईतील ही घटना ताजी असतानाच आता कोल्हापुरात (Kolhapur) एका विवाहित महिलेला निवडणूक खर्चासाठी माहेराहून तब्बल 10 लाख रुपये घेऊन येण्याची मागणी करत तिचा छळ करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनं राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. निवडणूक खर्चासाठी माहेरकडून दहा लाख घेऊन येण्याचा तगादा लावल्याने विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादाय घटना घडली.
कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड येथील विवाहित महिलेनं सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या आर्थिक आणि मानसिक त्रासातून टोकाचं पाऊल उचललं. कौसर गरगरे असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी कौसर यांचा भाऊ अल्ताफ आवटी यांनी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी कौसर यांचा पती, सासू-सासऱ्यासह जावेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. कौसर यांचा सासरा राजमहंदर गरगरे कुरुंदवाड नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून आहे. त्यामुळे निवडणुकीत खर्च करण्यासाठी माहेराहून 10 लाख घेऊन येण्याची मागणी विवाहितेकडे केली जात होती. त्यासाठी, सासरच्या मंडळींकडून कौसर यांचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. त्यामुळे, गुरुवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास कौसर यांनी घराच्या छताला गळफास घेऊन स्वत:चं आयुष्य संपवल्याचा धक्कादायक प्रकार घडला. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. मात्र, ऐन निवडणुकीच्या काळात अशा पद्धतीने विवाहित महिलेला देण्यात आलेल्या त्रासामुळे राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.