शिंदे गटाचा कोथळा अमित शाह काढणार ते उद्धव अन् राज ठाकरेंची एकजूट; संजय राऊतांनी महिन्याभरानंतर


संजय राऊत: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे गेल्या एक महिन्यापासून सार्वजनिक जीवनापसून दूर असल्याचे पाहायला मिळाले होते. एका गंभीर आजारावर संजय राऊत हे सध्या उपचार घेत आहेत. मात्र, आज महिन्याभरानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले.  शिंदे गँगच्या गुलाबरावांनी सांगितलंय की, लक्ष्मी दर्शन होणार. निवडणूक आयोगाने माहिती घ्यायला हवी, असे म्हणत त्यांनी मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्यावर निशाणा साधला. तर शिंदे गटाचा कोथळा अमित शाह (Amit Shah) काढणार, असे देखील संजय राऊत म्हणाले. तर राज ठाकरे (Raj Thackeray) सोबत आल्याने भारतीय जनता पक्षाचा (BJP) पराभव होणार असल्याचे भाष्य देखील संजय राऊत यांनी केले.

संजय राऊत म्हणाले की, माझी तब्ब्येत सुधारते आहे. उद्धव ठाकरे यांचं माझ्यावर बारीक लक्ष आहे. आता ही त्यांची परवानगी नाही. मात्र, तुम्ही सर्व आलात थोडं तब्बेतीत सुधारणा होतेय, अजूनही होईल. आजारापेक्षा उपचार कठोर असतात. मला खात्री आहे की, डिसेंबरनंतर मी पूर्ण बरं होईल. रिकव्हरी सुरु आहे. नगरपालिका निवडणुका उद्या आहेत. शिंदे गँगच्या गुलाबरावांनी सांगितलंय की, लक्ष्मी दर्शन होणार. निवडणूक आयोगाने माहिती घ्यायला हवी, असे त्यांनी म्हटले.

Sanjay Raut on मराठी: शिंदेंच्या गटाचा कोथळा अमित शाह काढणार

सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर निवडणूक प्रक्रियेतील भरारी पथकाने छापा टाकला. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत पैशाचा इतका खेळ झाला नव्हता. या निवडणुका राज्याचे मुख्यमंत्री किंवा सरकार निवडणूक लढवत नव्हते. स्थानिक पातळीवरच लोक लढत होते. आता 5, 6 हेलिकॉप्टर, खाजगी विमान वापरत आहेत. नगरपालिकेसाठी सत्तेतल्या 3 पक्षातील स्पर्धा आहे. इतके कोट्यावधी रुपये खर्च करून कोणासाठी लढताय? आपापसात मारामाऱ्या सोडा. तीन पक्षातील ही स्पर्धा आहे. शिंदे यांची शिवसेना म्हणायला आम्ही तयार नाही. त्यांचा कोथळा अमित शाह काढणार हे लिहून घ्या. त्यांनी आमचा काढायचा प्रयत्न केला होता. शिंदेंचे 35 आमदार फुटणार. रवींद्र चव्हाण हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांची नेमणूक त्यासाठीच केली आहे.

Sanjay Raut on मराठी: फडणवीस यांचे राजकारण शिंदे यांना कळतं नसेल तर…

त्यांना वाटतं की, दिल्लीचे दोन नेते आमच्या पाठीशी आहेत. पण ते कोणाचेच नाहीत. शिंदे यांचा पक्ष फुटलेला आहे. अमित शाहांनी निर्माण केलेला तो गट आहे. यांनी कधी शिवसेनेसाठी खस्ता खाल्ल्यात? पैशाच्या ताकदीवर निवडणुका लढणे म्हणजेच लोकशाही नाही. यशवंतराव चव्हाण यांच्यापासून आम्ही या राज्याचे नेतृत्व पाहिलेत. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अपेक्षा होती.  फडणवीस यांचे राजकारण शिंदे यांना कळतं नसेल तर त्यांनी करू नये. फक्त पैशावर राजकारण चालत नाही, असा हल्लाबोल त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केलाय.

Sanjay Raut on Raj Thackeray Uddhav Thackeray: शिवसेना आणि मनसेत सकारात्मक चर्चा

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता आहे. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की,  शिवसेना आणि मनसे या दोघात सकारात्मक चर्चा सुरु आहे. जागा वाटपावर बैठका सुरु आहेत.  उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याशी भेट होत आहे. राज ठाकरे यांनी निवडणुकीसंदर्भात PPT तयार केले होते, ते उद्धव ठाकरे यांना आवडलं. त्यामुळे कोणाला चिंता करायचे कारण नाही. मिस्टर शिंदे नरेंद्र मोदी, अमित शाह, गौतम अदानी हे त्रिकूट महाराष्ट्रापासून मुंबईला तोडण्याचे जे प्रयत्न करत आहेत ते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची एकजूट हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही, असा हल्लबोल देखील त्यांनी केला.

Sanjay Raut on Raj Thackeray: राज ठाकरे यांचे सोबत असणे ही महाराष्ट्राची गरज

संजय राऊत पुढे म्हणाले की, काँग्रेसशी आमची चर्चा सुरू आहे. जर काँग्रेसला वाटत असेल त्यांचा जर बिहारच्या निकालानंतर आत्मविश्वास वाढला असेल, ते मुंबईमध्ये स्वतंत्र लढायला तयार असतील तर त्यांना लढू द्या. आमची त्यांची चर्चा सुरू आहे. मी साधारण डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात दिल्लीत जाणार आहे किंवा माझा प्रयत्न असेल की, मी या विषयावर त्यांच्या हायकमांडशी बोलेन. महाविकास आघाडी म्हणून मुंबईमध्ये काँग्रेस सोबत असणे ही आमची भूमिका आहे. राज ठाकरे सोबत आल्याने भारतीय जनता पक्षाचा पराभव होणार आहे. मुंबईचा शत्रू भारतीय जनता पक्ष आहे. गौतम अदानीला ज्या पद्धतीने मुंबई घशात घातली जात आहे ती जर थांबवायची असेल तर राज ठाकरे यांचे सोबत असणे ही मुंबई आणि महाराष्ट्राची गरज आहे.

आणखी वाचा

Devendra Fadnavis On Nagarparishad Election Postponed: उद्या निवडणुका अन् आज पुढे ढकलल्या ही चूक; देवेंद्र फडणवीसांचे निवडणूक आयोगावर आक्षेप, काय काय म्हणाले?

आणखी वाचा

Comments are closed.