पुन्हा घोळ… पुण्यातून इच्छुक नवऱ्याचं नाव इंदापूरच्या मतदारयादीत अन् बायकोचं नाव बारामतीत
मुंबई : एकीकडे मतदार याद्यांमधील घोळावरुन महानगरपालिका क्षेत्रातील नेते, पदाधिकारी,कार्यकर्ते आणि मतदार आक्षेप घेत आहेत. दुसरीकडे राज्यातील नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकांच्या अनुषंगानेही गोंधळ उडाली आहे. कारण, 2 डिसेंबर रोजी मतदान सुरू असतानाच निकालाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे, आता नगरपालिका निवडणुकांचा निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार असल्याने ईव्हीएम मिशनच्या सुरक्षेवरुन प्रश्न उपस्थित होत आहेत. तर, मुंबई महापालिकेतील मतदार याद्यांमध्येही अद्यापही दुबार, तिबार मतदारांची (Voter list) नावे झळकत असून काहींचे रहिवाशी क्षेत्र एक आणि नाव दुसरीकडे असं गणित बिघडलं. आता, खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule) यांनीही याच मुद्द्याकडे लक्ष वेधत पुण्यातील (Pune) त्यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची अशी हकालपट्टी झाल्याचं निदर्शनास आणून दिलं आहे.
देशभरात मतदार याद्यांच्या संदर्भाने रोज नव्या कहाण्या समोर येत असून, मागणी नसतानाही मतदारच दुसऱ्या मतदारसंघात पाठविल्याचा प्रकारही घडत असल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पिंपरी चिंचवड युवक अध्यक्ष इम्रान शेख आणि त्यांचे कुटुंबीय गेली 35 वर्षांपासून पिंपरी-चिंचवडमध्ये राहते. त्यांनी कोणतीही मागणी नसताना त्यांचे मतदान पिंपरी चिंचवड शहराच्या बाहेर टाकण्यात आले आहे. इम्रान यांच्या आई राबिया शेख या प्रभाग 9 तर वडील युनूस शेख हे 8 मधून इच्छुक आहेत. राबिया यांचे मतदान शिर्सुफळ, ता. बारामती येथे तर वडील युनूस शेख यांचे मतदान इंदापूर येथील मतदारयादीत टाकण्यात आले आहे. त्यामुळे निवडणूक लढविण्यास दोघेही आपोआप अपात्र ठरतील, अशी बाब खासदार सुप्रिया सुळे यांनी निदर्शनास आणून दिली आहे.
निवडणुका जिंकण्यासाठी संभाव्य उमेदवारांचा पत्ताच गुल करण्याचा हा नवा प्रकार आहे का? अशी शंका यानिमित्ताने उपस्थित होत आहे. महाराष्ट्र शासन आणि निवडणूक आयोगाने याची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी अपेक्षा सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे, मतदार यादीतील घोळाचा मुद्दा आजही कायम असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेही सातत्याने या मुद्द्यावरुन निवडणूक आयोगाला लक्ष्य करत आहेत. विशेष म्हणजे नगरपालिका निवडणुकांच्या प्रभाग रचनांमध्येही अशाचप्रकारे एका प्रभागातील व्यक्तींची नावे दुसऱ्या प्रभागातील यादीत स्थलांतर करण्यात आल्याचं पाहायला मिळालं आहे.
मुंबईत 4 लाख 33 हजार मतदारांची नावे अनेकदा
मुंबई महापालिका निवडणुकीसाठीच्या मतदार यादीसंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईच्या मतदार यादीत दुबारच नव्हे तर 103 बार 4 व्यक्तींची नाव असलेले मतदार आहेत. मुंबईत तब्बल 4 लाख 33 हजार व्यक्तींची नावे मतदार म्हणून एकापेक्षा अधिक वेळा नोंदवली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दुबार मतदारांची आता फोटोसहित यादी पालिकेकडे प्राप्त झाल्याने ऑफिसमध्ये बसून दुबार मतदारांवर काम केले जाणार आहे. 4 लाख 33 हजार व्यक्तींची नावे वारंवार नोंदवली गेल्यानं अश्या डुप्लीकेट मतदारांची संख्या सुमारे 11 लाखांवर गेली आहे.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.