धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात


बीड: जिल्ह्यातील धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून रात्रीचा प्रवास करणारे प्रवासी वेगळ्याच दहशतीत आहेत. या मार्गावर चोरीच्या (Thief) कार्यक्रम वाढल्यानं खांबदिएस प्रशासन अलर्ट झाले आहे. एखाद्या सिनेमाला शोभेल अशी चोरी चोरट्यांच्या माध्यमातून ट्रॅव्हल्समध्ये होत असल्याचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला. ज्या व्हिडिओत चोरटे चालत्या ट्रॅव्हल्सवर चढून प्रवाशांच्या बॅगा लंपास करत आहेत. ही संपूर्ण घटना धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरची आहे. विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी येथील महामार्गावर गेवराईजवळ (Beed) एका भाविकांच्या एर्टिगा कारला मध्यरात्री रस्त्यात अडवून लुटण्यात आले होते. त्यानंतर, आता चोरीचा नवा फंडा समोर आला आहे. पोलिसांनी (Police) याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

सोलापूर ते धुळे महामार्गावर पाचोड ते येडशी यादरम्यान प्रवासी वाहन अडवून अथवा थांबलेल्या वाहनातील प्रवाशांना धमकावून लूटमार केली जात आहे. याबरोबरच ट्रॅव्हल्सवर ठेवलेल्या बॅगा लंपास करण्याच्या घटना घडत आहेत. याबाबत आता बीड पोलिसांनी मोहीम हाती घेतली असून अशा पद्धतीने चोरी करणाऱ्या टोळीचा शोध घेतला जात आहे. टीयासाठी हॉटेल चालकांची देखील मदत घेतली जात असून सीसीटीव्ही कार्यान्वित करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी देखील खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्यावतीने बीड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज यांनी केलं आहे.

चोरीचा नवा बीड पॅटर्न, चोरट्यांकडून अशी केली जाते चोरी

प्रवाशांच्या रात्रीच्या प्रवासात ज्या ठिकाणी जेवणासाठी ट्रॅव्हल्स थांबते, ती निघण्यापूर्वी ट्रॅव्हल्सच्या छतावर जाऊन चोरटे थांबतात. त्यानंतर काही अंतरावर गाडी जाताच प्रवाशांच्या बॅगा काढून खाली टाकल्या जातात. खाली असलेले साथीदार या बॅग गोळा करतात आणि त्यातील मौल्यवान वस्तू लंपास करतात. त्यानंतर, पुढे टोलनाक्यावर किंवा चढाच्या ठिकाणी गाडीची गती कमी होताच वरचा चोरटा उतरून पसार होतो. तर काही वेळेस चालत्या गाडीच्या पाठीमागे हे चोरटे दुचाकीवरून येऊन शिडीच्या माध्यमातून वर चढून बॅगाणे लंपास करतात. सोलापूर-धुळे महामार्गावर बाहेर राज्यातून येणारे प्रवासी एखाद्या बंद हॉटेलसमोर गाडी थांबवून गाडीतच आराम करतात, अशा प्रवाशांना चाकूचा अथवा शस्त्राचा भाग दाखवून लुटमार केली जाते. प्रवाशांच्या लुटमारीची ही घटना धक्कादायक असून पोलिसांनी यावर घन उपाय करण्याची मागणी होत आहे.

हेही वाचा

गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?

आणखी वाचा

Comments are closed.