पोलिसांनी रुग्णालयात पाऊल ठेवताच माणिकराव कोकाटेंची प्रकृती आणखी बिघडली? आज अँजिओग्राफी होणार?

मुंबई : नाशिकच्या सदनिका घोटाळा प्रकरणात दोषी ठरल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांना मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा लागलाहे. तर दुसरीकडे नाशिक सत्र न्यायालयाच्या निर्णयानंतर रक्तदाब वाढल्यानं माणिकराव कोकाटे मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल झालेत. दरम्यानमाणिकराव कोकाटे यांच्या प्रकृती संदर्भात (माणिकराव कोकाटे हेल्थ अपडेट) आता एक महत्वाची बातमी समोर आली आहे. कोकाटे यांचा उच्चरक्त दाबाचा त्रास लक्षात घेता त्यांना विश्रांतीची गरज असल्याची माहिती डॉक्टरni पोलिसांना (Nashik Police) दिलीय.

सध्या कोकाटेंवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर उच्च रक्तदाबाचा होणारा त्रास हा नियंत्रणात नसल्याने पुढील काही दिवस देखरेखेखाली ठेवणे गरजेचे असल्याचे मत डाॅक्टराणni पोलिसांकडे व्यक्त केल्याचे कळतंय.

Manikrao Kokate Health Update : डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आज अँजिओग्राफी केली जाण्याची शक्यता

दरम्यानवैदयकिय अहवाल आणि तज्ञ डाॅक्टरांचे मत लक्षात घेता NBW वाॅरंट पोलिस रुग्णालयात दिलं जाऊ शकतं, अशी सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे अटकेची कारवाई होण्याची शक्यता सध्या तरी कमीf आणि असल्याचे बोललं जात आहे. अशातचमाणिकराव कोकाटे यांची डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आज सकाळी अँजिओग्राफी केली जाण्याचीहे शक्यता आहे. त्यानंतर डॉक्टर त्यांच्या डिस्चार्ज संदर्भात निर्णय देणार. अशी देखील माहिती आता समोर आली आहे. परिणामीअँजिओग्राफीच्या रिपोर्टनंतरच डॉक्टर आणि पोलिसांची चर्चा होऊन त्यांच्यावर पुढची कारवाई होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

Nashik Police: नाशिक पोलीस नेमकं काय म्हणाले?

नाशिक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लिलावती रुग्णालयातील रात्रपाळीचे इंचार्ज डाॅ.कुलदिप देवरे यांचा जबाब आम्ही नोंदवलेला आहे. रुग्णालय प्रशासन यांच्याकडून आतापर्यंत करण्यात आलेल्या उपचाराची माहिती अहवाल घेतलेला आहे. तसेच पुढे काय उपचार करणं अपेक्षित आहे, याबातची माहिती लेखी स्वरुपात मागितली आहे. आम्ही कोर्टाच्या आदेशाचे पालन करत आहोत. जोपर्यंत पुढील वैद्यकिय कारवाई काय केली जाणार, याचा अहवाल प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबणं क्रमप्राप्त आहे. नाशिकहून आलेल्या पोलिसांच्या पथकात महिला पोलिस नसल्याने वांद्रे पोलिसांकडून मदत घेतली आहे. रुग्णालय प्रशासनाकडूनही न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले जाईल, असे आश्वासित केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे कोणत्या प्रकरणामुळं अडचणीत?

नाशिक शहरातील उच्चभ्रू परिसरात माणिकराव कोकाटे यांनी 30 वर्षांपूर्वी कमी उत्पन्न दाखवत अल्प उत्पन्न गटातून सदनिका मिळवली होती. स्वत:सह भाऊ विजय कोकाटे, पोपट सोनवणे आणि प्रशांत गोवर्धने या चार जणांनी कॅनडा कॉर्नर भागात निर्माण व्ह्यू अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्न गटासाठीच्या सदनिका प्राप्त केल्या होत्या. या प्रकरणी फेब्रुवारी 2025 मध्ये माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयानं दोषी ठरवलं होतं. यावर माणिकराव कोकाटे यांनी नाशिक सत्र न्यायालयात अपिल केलं होतं. सत्र न्यायालयानं शिक्षा कायम ठेवली. माणिकराव कोकाटे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. माननीय न्यायालयाच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सदस्य व पक्षातील आमचे सहकारी श्री. माणिकराव कोकाटे यांनी आपला राजीनामा अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केला आहे. कायदे-नियम हे सर्वोच्च स्थानी असून ते कोणत्याही व्यक्तीपेक्षा सर्वोतोपरी आहेत.

माणिकराव कोकाटे यांच्या अटकेसाठी नाशिक पोलिसांचं पथक मुंबईत पोहोचलं आहे. या पथकात दहा हवालदार तीन अधिकारी अशा एकूण 13 जणांचा समावेश आहे. आता लीलावती रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या भूमिकेवर आणि वैद्यकीय अहवालावर कोकाटे यांना अटक होणार की नाही हे अवलंबून आहे.

महत्वाच्या बातम्या:

आणखी वाचा

Comments are closed.