महायुतीला बाधा होणार नाही अशी युती होईल, माझे आशिष शेलारांशी बोलणे सुरु, काय म्हणाले तटकरे?
सुनील तटकरे: मंत्री आशिष शेलार यांच्याशी माझे बोलणे सुरु आहे, त्यामुळं काही संभ्रम नाही. महायुतीला बाधा होणार नाही अशा प्रकारे आमच्या युती होतील असे मत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी व्यक्त केले आहे. आम्ही महायुती म्हणून एनडीएचा भाग आहोत असे तटकरे म्हणाले.
प्रत्येक निवडणूक एक आव्हानाच
महायुतीला बाधा होणार नाही अश्या आमच्या यूती होतील असे तटकरे म्हणाले. प्रत्येक निवडणूक एक आव्हानाच असते. त्यामुळं कुणालाही कमजोर न समजता निवडणुकीला सामोरे जायचे असते असे तटकरे म्हणाले.
आज आम्ही सर्व आमदार अजित पवार यांची भेट घेण्यासाठी जाणार, दोन दिवसात महापालिकेसंदर्भात निर्णय
नियोजीत पद्धतीने ज्या ठिकाणी आमचे आमदार आहेत त्या ठिकाणी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत आहोत. कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवणे हा आमचा हेतू आहे. महापालिकेच्या बाबतचा निर्णय पुढच्या दोन दिवसात अधिकृतरित्या आम्ही जाहीर करणार असल्याची माहिती तटकरे यांनी दिली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांची काल बैठक झाली आहे. लवकरच आमचा निर्णय होणार आहे. आज आम्ही सर्व आमदार अजित पवार यांची भेट घेण्यासाठी जाणार आहोत. आज सगळा आढावा घेणार असल्याचे तटकरे म्हणाले.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जागावाटपावरुन रस्सीखेच
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुतीतील भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जागावाटपावरुन अजूनही रस्सीखेच सुरू आहे. एकूण २२७ जागांपैकी १८० जागांवर एकमत झाले असले तरी, उर्वरित ४७ जागांवर अजूनही तिढा कायम आहे. यापैकी ३० ते ४० जागांवर तिसऱ्या फेरीच्या चर्चेतून तोडगा निघण्याची शक्यता आहे. यानंतरही ज्या जागांवर एकमत होणार नाही, त्या जागांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः चर्चा करून निर्णय घेतील. दुसरीकडे, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईत महायुतीत लढायचे की नाही, यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील सर्व पर्यायांवर विचार करून पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढण्यावर सहमत झाले असले तरी, मुंबईबाबत अजित पवारांनी पर्याय खुले ठेवले आहेत. ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई महापालिकेत मात्र युती करून लढण्यावर एकमत झाले आहे.
आणखी वाचा
Comments are closed.