पनवेल महापालिकेवर यंदा कोणाची बाजी? निवडणुकीचा इतिहास, वॉर्ड, प्रभाग आरक्षण ते 2016 चा निकाल

पनवेल महानगरपालिका निवडणूक 2026 पनवेल: राज्यातील तब्बल 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला. पनवेलसह राज्यातील एकूण महापालिकांमध्ये 15 जानेवारी 2026 ला मतदान होणार आहे. तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकूण 20 प्रभागांसाठी मतदान होणार आहे. पनवेल महापालिकेची ही दुसरी सार्वत्रिक निवडणूक आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात पाच लाख 54 हजार 578 मतदार आहेत (पनवेल नगरपालिका निवडणूक मराठी बातम्या)

पनवेल महापालिकेचा इतिहास- (पनवेल महानगरपालिका निवडणूक 2025)

पनवेल महापालिका महाराष्ट्रच्या रायगड जिल्ह्यातील पनवेल शहराचा कारभार सांभाळणारी महापालिका आहे. या महापालिकेची स्थापना 2016 मध्ये झाली. पनवेल नगर परिषदेचा पूर्वीचा भाग, सिडको वसाहती आणि 29 महसुली गावांचा यामध्ये समावेश करण्यात आला. 110 किलोमीटर क्षेत्रफळ असणाऱ्या महापालिकेची पहिली निवडणूक 2017 मध्ये झाली. त्या वेळी 2011 च्या जनगणनेनुसार प्रभाग रचना होती. समाविष्ट गाव आणि खारघर असे ते 6 अशी प्रभागांची संख्या आहे. कळंबोली वसाहती , 8, आणि 10 असे प्रभाग आहेत. क्रमांक मध्ये आसूड गाव, वळवली, टेंभुर्डे, खिडूकपाडा या गावांचा समावेश आहे. 11 ते 13 क्रमांकाच्या प्रभागात विशेष करून कामोठेचा भाग येतो. त्याचबरोबर 14 मध्ये खांदा गाव तसेच पनवेलच्या काही परिसराचा समावेश करण्यात आला आहे. १५ मध्ये संपूर्ण खांदा वसाहत असून, 16, १७ प्रभागात नवीन पनवेल समाविष्ट आहे. तसेच १८ आणि 19 या प्रभागात संपूर्ण पनवेल शहर सामावून घेण्यात आलेले आहे. प्रभाग 20 मध्ये टक्का, पोडी आणि काळुंद्रे गाव येते. अशा प्रकारे पूर्वीची प्रभाग रचना असून, मध्यंतरी महाविकास आघाडीने एक सदस्य रचना केली होती. त्याचबरोबर सदस्य संख्याही वाढवली होती.

पनवेल महापालिकेच्या प्रभाग रचना करण्याबाबत राज्य सरकार विचाराधीन-(पनवेल महानगरपालिका निवडणूक 2026)

पनवेल महापालिका क्षेत्रात पाच लाख 54 हजार 578 मतदार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सत्तेत आल्यानंतर पूर्वीच्या प्रभाग रचनेचा निर्णय रद्द करून पुन्हा बहुसंख्य सदस्य रचना करण्याचे ठरले. मध्यंतरी obc आरक्षणामुळे निवडणुका रखडल्या. सर्वोच्च न्यायालयाने 6 मध्ये रोजी यासंदर्भात निकाल देत चार महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार राज्यभर हालचाली सुरू झाल्या आहेत. 2017 प्रमाणेच प्रभाग रचना करण्याबाबत राज्य सरकार विचाराधीन आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच प्रभाग कायम राहतील, अशी दाट शक्यता आहे

यंदाच्या निवडणुकीतील महत्वाचे मुद्दे-

पनवेल महापालिकेवर 2017 ला भाजप ची एक हाती सत्ता आली होती, ग्रामीण , पनवेल महापालिकेत शहरी ,ग्रामीण सिडको भाग समाविष्ट असून, पाणी ,गटारे सार्वजनिक वाहतूक या समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहेत. महापालिकेत याआधी भाजपची एक हाती सत्ता होती 78 नगरसेविका पैकी 51 नगरसेवक हे भाजपचे निवडून आले आहे. परंतु आता शिवसेना शिंदे गटसोबत युती करायची आहे, मागील निवडणुकीत शिवसेनेला खातं उघडते आले नाही ,परंतु यावेळी युती करणार असून, केलेल्या विकास कामाच्या जोरावर ही निवडणूक लढवणार असल्याचे भाजपचे आमदार प्रशात ठाकूर यांनी सांगत पुन्हा भाजपचा महापौर बसेल असा विश्वास व्यक्त केला आहे

पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी यंदा आरक्षण कसं असेल?

या निवडणुकीत पनवेल महानगरपालिकेच्या 20 प्रभागांतील एकूण 78 नगरसेवक पदांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये 50 टक्के जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. आरक्षण सोडतीनुसार, सहा जागा अनुसूचित जातींसाठी, त्यापैकी तीन जागा अनुसूचित जात महिला उमेदवारांसाठी, तर अनुसूचित जमातींसाठी दोन जागांपैकी एक जागा महिला उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी देखील मोठ्या प्रमाणात आरक्षण देण्यात आले आहे. या आरक्षण सोडतीनंतर पनवेल परिसरात निवडणुकीच्या हालचालींना वेग आला असून, विविध पक्षांकडून संभाव्य उमेदवारांची चर्चा सुरू झाली आहे

पनवेलमध्ये एकूण लाख 54 हजार 578 मतदार- (श्रोणि निवडणूक २०२६)

पनवेल महापालिकेने नुकतीच जाहीर केलेल्या अंतिम मतदार यादीनुसार यावेळी एकूण 5 लाख 54 हजार 578 मतदारांना मतदानाचा अधिकार मिळणार आहे. यामध्ये 2 लाख 59 हजार 685 महिला मतदार तर 2 लाख 94 हजार 821 पुरुष मतदारांचा समावेश आहे.

पनवेल महापालिकेवर पुन्हा भाजपची सत्ता? ,पनवेल भाजप)

पनवेलचे राजकीय समीकरण हे माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या भोवती फिरत आहे, ठाकूर कुटूंबीय शेकाप पक्षात असताना शेकाप ची शक्ती होती, कॉग्रेस पक्षात असताना पनवेल मद्ये कॉग्रेस ची शक्ती होती, भाजपमध्ये असताना भाजप सत्ता आहे ,यावेळी प्रशात ठाकूर यांनी शेकाप पक्ष फोडला असून , शेकापकडे अवघे पाच नगरसेवक उरले आहेत, यामुळे स्ट्रॉंग विरोधी पक्ष ठेवला नसल्याने भाजप ची सत्ता पुन्हा पनवेल महापालिकवर फडकेल असं मत विश्लेषक सांगत आहेत

पनवेल महानगरपालिका 2026 साठी निवडणूक कार्यक्रम- (पनवेल निवडणूक तारीख 2026)

  • नामनिर्देशन– 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर
  • नामनिर्देशन पत्राची छाननी– 31 डिसेंबर
  • उमेदवार मागे घेणे- 2 जानेवारी 2026 पर्यंत
  • अंतिम यादी आणि चिन्ह- 3 जानेवारी 2026
  • मतदान- 15 जानेवारी 2026
  • मतमोजणी/निकाल-16 जानेवारी 2026

2016 चे बाजू असलेला बलाबल-७८ नगरसेवक (पक्ष शहाणे नगरसेवक पनवेल 2016)

  • भाजप – ५१
  • शेकाप23
  • काँग्रेस – 2
  • राष्ट्रवादी – 2

सध्या कुणाकडे किती नगरसेवक? (पक्षनिहाय नगरसेवक बीएमसी 2025)

  • भाजप : 51
  • शिवसेना : 0
  • राष्ट्रवादी :2
  • मनसे : ०
  • शेकाप– 23
  • कॉग्रेस – 2
  • प्रभाग – 20
  • एकूण – 78

हेही वाचा>>

BMC Election 2026: मुंबई महापालिकेवर यंदा कोणाचा झेंडा, BMC निवडणुकीचा इतिहास, वॉर्ड, प्रभाग आरक्षण ते 2017 चा निकाल

आणखी वाचा

Comments are closed.