छत्रपती संभाजीनगरमध्ये बसपाकडून 10 उमेदवारांची यादी जाहीर, कोणाकोणाला संधी?
छत्रपती संभाजीनगर निवडणूक 2026: राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी आता राजकीय वातावरण तापू लागलंय. मुंबई ठाणासह सर्वच महापालिकांमध्ये 15 जानेवारी रोजी मतदान तर 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये बहुजन समाज पक्षाने (BSP) महापालिकांसाठी आपली उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. बसपाकडून 10 उमेदवारांना संधी देण्यात आलीय. (Muncipal Corporation Election 2026)
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोर्चाबांधणीला वेग आलाय. राजकीय पक्ष उमेदवारांच्या याद्या टप्प्याटप्प्याने जाहीर करत आहेत. कालच (25 डिसेंबर) ऑल इंडिया मजलिस -ए- इत्तेहादुल मुस्लिमीन ( AIMIM) या पक्षाने महाराष्ट्रातील काही महापालिकांसाठी आपली उमेदवारी जाहीर केली होती. यात छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी MIM ने 8 उमेदवारांना संधी दिली आहे. त्यानंतर आज बसपानेही संभाजीनगर महापालिकेसाठी 10 उमेदवारांची घोषणा केलीय.
बहुजन समाज पक्षाकडून (BSP) छत्रपती संभाजी नगर महापालिका निवडणुकीसाठी एकूण दहा उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये –
1. शंकर यादव चौधे (ओबीसी) – प्रभाग 28 ब
2. कुणाल सुभाष लांडे (Open) – प्रभाग 11 ड
3. अनिल अंबादास साळवे(SC)- प्रभाग 24 अ
4. विष्णू तुकाराम वाघमारे- प्रभाग 27 ड
5. सुनील पटेकर- प्रभाग 28 ड
6.अमोल रमेश पवार – प्रभाग 8 ड
7. सचिन भिमराव महापूरे- प्रभाग 3
8. भगवान रामराव पवार (SC)- प्रभाग 9 अ
9. अनिल तात्यराव गवळे (SC)- प्रभाग 29 अ
10. कु. सविता ज्ञानेश्वर वाघ (ओबीसी) – प्रभाग 24
एमआयएमने 8 उमेदवार रिंगणात उतरवले
संपूर्ण भारत मजलिस-अ-इत्तेहादुल मुस्लिमीन (aimim) या पक्षाने महाराष्ट्रातील काही महापालिकांसाठी आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. एमीम कडून छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी एकूण आठ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. इम्तियाज जलील यांनी ‘एक्स’वरही पोस्टिंग सांगितले च्या एमीम चे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांच्या सूचनेनुसार 2026 च्या महानगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येत आहेत, याचा मला आनंद आहे.
एमीम कडून छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी एकूण आठ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये –
1) प्रभाग 1 – अझहर अयुब माझे
2) प्रभाग 3 – इम्रान पटेल
3) प्रभाग 9 – काकासाहेब काकडे
4) प्रभाग 9 – मतीन माजेद शेख
5) प्रभाग 12 – हाजी शेरखान अब्दुल रेहमान माझे
6) प्रभाग 28 – साबर प्राणी शेख
7) प्रभाग 28 – अब्दुल मतीन माझे
8) प्रभाग 16 – सय्यद फरहान नेहरी
नाशिक महापालिका निवडणुकीसाठी एमीम ने तीन उमेदवारांची घोषणा केली आहे.
आणखी वाचा
Comments are closed.