मुंबईत राष्ट्रवादीची 100 जणांची यादी, घरातील तिघांना उमेदवारी; सना मलिक यांनी उलगडलं कोडं

मुंबई : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिका (BMC निवडणूक) निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांचे जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधू एकत्र आले असताना, दुसरीकडे महायुतीमधील राष्ट्रवादी (राष्ट्रवादी) पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत आहे. विशेष म्हणजे, मुंबईबाई). महापालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 100 उमेदवारांची यादी आज संध्याकाळपर्यंत जाहीर होईल, अशी माहिती आमदार आणि नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांनी दिली. पक्षाकडून तिघांना उमेदवारी देण्यात आली आहे. माझे काका कप्तान मलिक, त्यांची सुन बुशरा मलिक आणि आत्या सईदा खान निवडणूक लढत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

सना मलिक यांनी कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी अर्ज देण्यात आल्याबाबत माहिती देताना सांगितले की, माझे काका कप्तान मलिक, त्यांची सुन बुशरा मलिक आणि आत्या सईदा खान निवडणूक लढत आहेत. कप्तान मलिक आणि सईदा खान आधी नगरसेवक होते. मात्र, कप्तान मलिक यांचा प्रभाग यंदाच्या निवडणुकीत महिलांसाठी राखीव झाला आहे. म्हणून त्यांची सून निवडणूक लढत आहे, असे सना मलिक यांनी म्हटले. माझे वडील म्हणाले होते की माझ्या विधानसभा मतदारसंघात कोणाला संधी देणार नाही. अनेक लोक आले होते, कुटुंबातील उमेदवारी 165 प्रभागसाठी द्या असा आग्रह होता. मात्र, माझ्या वडिलांनी त्याला स्पष्ट नकार दिला. आम्ही स्वबळावर निवडणूक लढवत आहोत, पहिली यादी संध्याकाळपर्यंत येईल. जवळपास 100 उमेदवार आम्ही उभे करणार आहोत, आमचा परफॉर्मनस चांगला असेल, असेही सना मलिक यांनी म्हटले.

सर्वच समाजाच्या उमेदवारांना संधी

आम्ही मुस्लिम लोकांना उमेदवारी देत नाही, संध्याकाळी यादी आली की तुम्हाला लक्षात येईल, आम्ही सर्व समाजाच्या लोकांना संधी दिली आहे. आम्ही स्थानिक पातळीवर चर्चा करत होतो, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांसोबत युतीबाबत काय झालं माहिती नाही, असेही सना मलिक यांनी स्पष्ट केले.

भाजपकडून स्टार प्रचारकांची फौज मैदानात

मुंबईतील उत्तर भारतीय मतदारांवर लक्ष केंद्रीत करत भाजप आणि महायुतीने स्टार प्रचारकांची फौज मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपकडून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूर, खासदार व अभिनेता मनोज तिवारी, तसेच भोजपुरी चित्रपटसृष्टीतील निरुहुआ आणि रवी किशन यांना प्रचारात सहभागी केलं जाणार आहे. उत्तर भारतीय मतदारांची संख्या जास्त असलेल्या वॉर्डांमध्ये हे नेते आणि कलाकार प्रचाराच्या माध्यमातून थेट मतदारांपर्यंत पोहोचणार आहेत. दुसरीकडे, शिवसेनेकडूनही प्रचारासाठी खास तयारी करण्यात आली असून, पक्षाचे नेते आणि अभिनेते गोविंदा यांना निवडणूक प्रचारात सक्रियपणे उतरवण्याची योजना आहे. त्यामुळे येत्या काळात मुंबईतील अनेक वॉर्डांमध्ये स्टार प्रचारकांच्या जंगी प्रचार सभांचा माहोल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गुंड बंडू आंदेकर मैदानात, विकासाच्या नावाने घोषणाबाजी, कोणत्या पक्षातून लढणार?

आणखी वाचा

Comments are closed.