मुंबईसाठी महायुतीचं ठरलं, शिंदेंच्या शिवसेनेला 79 जागा; 20 जागांसाठी वेगळाच फॉर्म्युला

मुंबई : राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरायला अवघे तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. मात्र, अद्यापही राजकीय पक्षांकडून जागावाटपावरच चर्चा सुरू आहे. मुंबई). ठाकरे बंधूंकडून युतीची घोषणा झाली, मात्र जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटेना झालाय. मुंबईतील दादर-माहीम, शिवडी, विक्रोळी, भांडुप, चांदिवली या मतदारसंघातील जागांवर तिढा कायम असून या मतदारसंघात किमान 2 ते 3 जागा द्याव्यात, अशी मनसेची मागणी आहे. दुसरीकडे मुंबई महापालिकेसाठी (BMC election) भाजप आणि शिवसेना शिंदे यांच्यातील महायुतीचे (Mahayuti) जागा वाटप अंतिम टप्प्यात असून 207 जागांवर एकमत झालं आहे. 20 जागांवरील चर्चा सुरू असून लवकरच पहिली यादी जाहीर होणार आहे.

शिवसेना आणि मनसेच्या युतीनंतर आज मातोश्री बंगल्यावर दोन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक झाली. येथे झालेल्या बैठकीनंतर राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी मनसेचे नेते पुन्हा शिवतीर्थला पोहोचले होते. तर दुसरीकडे महायुतीच्या नेत्यांचीही बैठक संपन्न झाली असून 207 जागांवर एकमत झाले आहे. मात्र, 20 जागांवर दोन्ही पक्षाकडून अंतिम चर्चा सुरू आहे. महायुतीच्या नेत्यांची रंगशारदा येथील बैठक संपून आता शिवसेना आणि भाजपचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन बंगल्यावर पुढील चर्चेसाठी निघाले आहेत. उरलेल्या 20 जागांच्या संदर्भात आता एकनाथ शिंदे यांच्या सोबत चर्चा होणार आहे. मंत्री आशिष शेलार, उदय सामंत आणि राहुल शेवाळे एकनाथ शिंदेंच्या भेटीला पोहोचले आहेत.

समोरचा उमेदवार बघून ठरणार पक्ष?

भाजप शिवसेनेची आज एकत्रित बैठक झाली, जनसभा नियोजन आणि संयुक्त सभा, जागावाटपाची ही चर्चा झाली आहे. भाजप 128 जागा, शिवसेना 79 जागा अशा 207 जागांवर एकमत झालेला आहे. उर्वरित 20 जागांची चर्चा सुरू असून राष्ट्रीय पातळीवर चर्चा होऊन घडलेल्या विविध जागांचा तोडगा काढण्यात येईल. समोर उमेदवार कोण आहे याचा विचार करून उर्वरित जागांवर भाजपा लढणार की शिवसेना लढणार याचा निर्णय घेऊ, अशी माहिती मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी दिली. मुंबई शहराचा रंग बदलणाऱ्या शक्तींना परास्त करण्यासाठी आमची महायुती तयार आहे, सर्व मित्र पक्षांना समाधानकारक जागा देण्यात येतील. कोण किती जागा लढणार हे महत्वाचे नाही, वरिष्ठ पातळीवर निर्णय घेऊन यादी जाहीर करू असेही अमित साटम यांनी म्हटले. दुसरे लोक काय करतात यावर आमचे निर्णय ठरतील. तर, निवडणुकीसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या एकत्रित सभा होणार आहेत. त्यासाठी, 1 किंवा 2 तारखेपासून प्रचाराला सुरुवात होईल.

आदित्य ठाकरेंवर टीका

बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या मुद्द्याला तिलांजली देण्याची काम उद्धव ठाकरे यांनी केले आहे. क्रिमिनल माईंडच्या लोकांना ठाकरे पक्षात प्रवेश देत आहेत. तर, आदित्य ठाकरे हे बाल बुद्धीचे आहेत, त्यांना उत्तर देण्याची गरज नाही. जे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, त्यांनी आम्हाला राम शिकाऊ नये, अशा शब्दात साटम यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली.

गरज पडल्यास उमेदवारांची अदलाबदली

महायुती कशी जिंकणार याच नियोजन करत आहे, आम्ही उमेदवारांवर लक्ष केंद्रीत करत आहोत. आम्हाला उमेदवारांची अदलाबदली करायची असेल तर तीही करू, दोन्ही पक्षाचं सन्माजनक जागा वाटप होईल, असे शिवसेना सरचिटणीस तथा खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटलं. मुंबईत महायुतीने 150 जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे, जागा व पक्ष बाजुला ठेवत आहोत. एकमेकांना विश्वासात घेऊन प्रत्येक उमेदवार कसा निवडून येईल यावर फोकस आहे. उमेदवार कुठला जिंकेल हा निकष आहे, संख्याबळ दोन्ही पक्षांसाठी महत्त्वाचे नाही, गरज असेल तिथे उमेदवारांची अदलाबदल केली जाईल, अशी माहिती राहुल शेवाळे यांनी दिली.

रिपल्बिकन पक्षाकडून 17 जागांची मागणी

मुंबई महापालिकेसाठी रिपब्लिकन सेनेकडून मुंबईतील 17 जागांचा मागणी करण्यात आली आहे. आनंदराज आंबेडकर 17 जागांच्या बाबतीत आग्रही आहेत. रिपब्लिकन पक्षाची शिवसेनेसोबत युती असून सायन, धारावी येथे प्रत्येकी 1 जागेची मागणी रिपल्बिकन पक्षाने केली आहे. चेंबुर, कुर्ला विभागातील 8 जागा आणि मुंबई उपनगरातील 7 जागांची रिपब्लिकन सेनेकडून शिंदेंच्या शिवसेनेकडे मागणी करण्यात आली आहे.

हेही वाचा

मोठी बातमी : सुनील तटकरे रायगडचा आका, त्यांच्याच घरी काळाखेंच्या हत्येचा प्लॅन ठरला, शिंदेंच्या आमदाराचा खळबळजनक आरोप

आणखी वाचा

Comments are closed.