ठाकरे बुंधुंची काँग्रेससोबत हातमिळणी! पुण्यात ठाकरे गट आणि मनसेच्या बैठकीत काय ठरलं?

पुणे : महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पुण्यात देखील बैठक सुरु आहेत. सध्या पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे गटाची बैठक सुरु आहे. जागावाटपासंदर्भात आजच मनसे आणि सेनेचा आजच अंतिम निर्णय होणार असल्याची माहितीमिळत आहे. हॉटेल क्लार्क इन मध्ये दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीला सुरुवात झाली आहे.

पुणे महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार

पुणे महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार आहे. उद्या पुण्यात होणार काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची एकत्रित पत्रकार परिषद होणार आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यात मनसे आणि उबाठा ची बैठक सुरु आहे. मुंबई पाठोपाठ पुण्यात सुद्धा ठाकरे बंधूंच्या दोन्ही सेना एकत्र आल्या आहेत. काँग्रेस आणि शिवसेना उबाठा बैठकीनंतर आता मनसे – उबाठा ची बैठक सुरु झाली आहे. जागा वाटप होण्याच्या अंतिम निर्णयापूर्वी ठाकरे बंधूंच्या सेनेची एकत्र बैठक सुरु झाली आहे.

जागा वाटपाच्या संदर्भात सकारात्मक चर्चा : साईनाथ बाबर

दरम्यान, पुण्यात सुरु असलेल्या बैठकीबाबत मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी माहिती दिली आहे. मनसे आणि शिवसेनेच्या युतीमध्ये झालेल्या जागा वाटपाच्या संदर्भात सकारात्मक चर्चा झाली आहे. उद्या सकाळी शिवसेना आणि मनसेचा जो आकडा आहे तो उद्या जाहीर होणार आहे. मनसे चे प्रमुख पदाअधिकारी जे राज साहेब यांनी नेमले आहेत ते सगळे इथे उपस्थित होते, आमच्याकडे कुठली ही वेगळी चर्चा नसल्याची माहिती साईनाथ बाबर यांनी दिली आहे.

आणखी वाचा

Comments are closed.