मुंबईतील भाजप- शिवसेनेचा तिढा सुटला, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 90 जागा, भाजप 137 जागा लढणार

बीएमसी निवडणूक शिवसेना आणि भाजप जागावाटप मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अखेर भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवेसना यांचं जागावाटप ठरलं आहे. मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप 137 जागा लढेल. तर, एकनाथ शिंदेंची शिवेसना  90 जागांवर निवडणूक लढणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास एक दिवस बाकी असताना भाजप आणि शिवसेनेचे जागा वाटप निश्चित झालं आहे.

अमित साटम काय म्हणाले?

भाजप, शिवसेना, आरपीआयची महायुतीची चर्चा पूर्ण झाली आहे. यापूर्वी आमची 207 जागांवर चर्चा पूर्ण झाली होती. आता आमची 227 जागांवर चर्चा झाली आहे. भाजप 137 जागा लढवणार आहे. तर, एकनाथ शिंदेंची शिवेसना 90 जागा लढवणार आहे. महायुतीचे मित्र पक्षांचा यातच समावेश आहे.227 जागांमध्ये  137 जागा भाजपच्या कोट्यात आहेत आणि शिवसेनेच्या  90 जागांमध्येच इतर मित्र पक्षांना सामावून घेतलं जाणार आहे, असं अमित साटम म्हणाले. भाजप आणि शिवसेनेत कोणतीही नाराजी नाही, सर्वांना सामावून घेतल्यानं वेळ लागला आहे. भाजप 137 जागा लढणार आहे, तर शिवसेना 90 जागा लढवणार आहे, असं साटम यांनी सांगितलं.

राहुल शेवाळे काय म्हणाले?

सकारात्मक चर्चा होऊन चांगला फॉर्म्युला ठरवण्यात आला आहे. 227 जागांवर महायुतीचे उमेदवार निवडणूक लढवून  150 पेक्षा जास्त जागा निवडून आणणार आहोत, असं माजी खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटलं. मुंबईवर महायुतीचा मराठी महापौर बसवणार आहोत हा संकल्प केला आहे. महायुतीचे घटकपक्ष आहेत, ज्या पक्षांशी त्यांची युती आहे, ते पक्ष घटक पक्षांसदर्भातील निर्णय घेतील, असं शेवाळेंनी म्हटलं.

रिपब्लिकन सेनेला किती जागा मिळणार असं विचारलं असता राहुल शेवाळे यांनी याबाबतचा निर्णय एकनाथ शिंदे निर्णय घेतील, असं म्हटलं. भाजपचे वरिष्ठ त्यांच्या घटक पक्षाबाबत निर्णय घेतील, असं राहुल शेवाळे म्हणाले.

आता सकारात्मक चर्चा होऊन चांगला फॉर्म्युला झालेला आहे.  227 जागांवर महायुतीचे उमेदवार अर्ज भरतील. आम्ही विकासाच्या मुद्यावर निवडणुकीला सामोरं जाणार आहोत. आम्हाला विश्वास आहे की मुंबईकर विकासाच्या मुद्यावर आम्हाला मतदान करेल, असं राहुल शेवाळेंनी म्हटलं.

मुंबईकरांना माहिती आहे, राज्यात आणि केंद्रात महायुतीची सत्ता आहे. मुंबईत महायुतीची सत्ता आल्यानंतरच मुंबईचा विकास होऊ शकतो हा मुंबईकरांना विश्वास आहे. त्यामुळं मुंबईकर महायुतीचा महापौर निवडण्यासाठी मतदान करतील,असं राहुल शेवाळे यांनी म्हटलं.

दरम्यान, ठाणे महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढणार आहेत. शिंदेंची शिवेसना 87 आणि भाजप 40 जागांवर लढणार आहे, अशी माहिती आहे.

आणखी वाचा

Comments are closed.