शिवसेना 90 जागांवर रिंगणात, 35 जणांची बंडखोरी, उद्याचा दिवस निर्णयाक, नाराजांचं समाधान होणार?

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीत भाजप 137 जागांवर निवडणूक लढवत आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवेसनेला 90 जागा मिळाल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडून 90 जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले असले तरी  35 जणांनी नाराज होत बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उद्या उमेदवारी अर्ज मागं घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे वरिष्ठ नेते नाराजांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

शिवसेनेत बंडखोर उमेदवारांची यादी मोठी

मुंबईत शिवसेनेत बंडखोरी केलेल्या उमेदवारांची यादी मोठी असल्याची माहिती आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेच्या 35 पदाधिकाऱ्यांनी नाराज होऊन अपक्ष उमेदवारी भरल्याची सूत्रांची माहिती आहे. या नाराज अपक्ष उमेदवारांची समजूत काढण्याचा पक्षतील वरिष्ठ नेत्यांकडून प्रयत्न करण्यात येत आहे.

मंत्री उदय सामंत, खासदार रविंद्र वायकर, राहुल शेवाळे, शितल म्हात्रे, मिलिंद देवरा यांच्याकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यांशी संपर्क करून समजूत काढली जात आहे, अशी माहिती आहे. उद्या अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून बंडखोर उमेदवारांची समजूत काढण्यात शिवसेना नेत्यांना यश येतय का हे पाहणं महत्वाचं आहे.

प्रकाश सुर्वे यांच्यावर एकनाथ शिंदे रागावला

एकीकडे पक्षातील वरिष्ठ नेते नाराजीमुळं बंडखोरी केलेल्या उमेदवारांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल असल्याची माहिती आहे. मागाठाणे मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्यावर पक्षश्रेष्ठी नाराज असल्याची माहिती आहे.  मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये होणाऱ्या महायुतीच्या प्रचारापासून प्रकाश सुर्वे दूर आहेत.  राज सुर्वे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सांगितल्यामुळे प्रकाश सुर्वे इतर उमेदवारांसाठी नॉट रिचेबल झाले असल्याची तक्रार करण्यात आली आहे.  स्थानिक महायुतीच्या उमेदवारांनी प्रकाश सुर्वे यांची तक्रार केल्याने पक्षश्रेष्ठी प्रकाश सुर्वे यांच्यावर नाराज झाले आहेत.  यामुळं प्रकाश सुर्वे यांच्यावर पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता आहे.

उद्याचा दिवस निर्णायक

मुंबई महापालिकेसह राज्यातील सर्व महापालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना अर्ज माघारी घेण्याची उद्यापर्यंत (2 जानेवारी) संधी आहे. राज्यातील निवडणूक लढणाऱ्या सर्व पक्षांना त्यांच्या नाराज आणि बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची समजूत काढण्याची शेवटची संधी आहे. यामुळं उद्याचा दिवस महापालिका निवडणकीच्या निमित्तानं निर्णयाक ठरणार आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.