पुण्यातून उमेदवारी अर्ज दाखल, मग प्रचंड ट्रोल, रडत-रडत निवडणुकीतून माघार; संपूर्ण महाराष्ट्रात
पूजा मोरे-जाधव पीएमसी निवडणूक 2026: पुणे महापालिका निवडणुकीमध्ये (PMC Election 2026) भाजपने प्रभाग क्रमांक 2 मधून पूजा मोरे-जाधव (Pooja More-Jadhav) यांना उमेदवारी दिली होती. मात्र पूजा मोरे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांना भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं. या ट्रोलिंगमुळे पुजा मोरेला पुणे मनपाची उमेदवारी अर्ज मागे घेतला. ट्रोलर्सने पुजा जाधव यांचे जुने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधी व्हिडिओ काढून ट्रोलिंग सुरू केलं होतं. त्यामुळे पुणे महापालिकेसाठी भाजपकडून अर्ज भरलेल्या पूजा मोरे – जाधव यांना त्यांचा अर्ज वापस घेण्याची नामुष्की ओढवली. सदर घडलेल्या सगळ्या प्रकरणामुळे पूजा मोरे-जाधव यांची सध्या राज्यभरात चर्चा आहे.
कोण आहे पूजा मोरे-जाधव? (Who Is Pooja More-Jadhav)
पूजा जाधव या मूळच्या गेवराईच्या असल्याची माहिती आहे. त्यांनी गेवराई येथून 2024 साली विधानसभा निवडणूकही लढवली होती. संभाजीराजे छत्रपती यांनी काढलेल्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षातर्फे त्यांना उमेदवारी देण्यात आलेली होती. 2017 सालच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत त्यांनी राज्यातील सर्वात तरूण पंचायत समितीच्या सदस्या म्हणून निवडून येण्याचा मान मिळवला. त्यानंतर त्यांनी शेतकरी प्रश्नांवर अत्यंत आक्रमकपणे काम करायला सुरुवात केली. जुलै 2025 रोजी पूजा जाधव यांनी पुण्यामध्ये 5 हजार किलो चिकन मोफत वाटले होते, तेव्हापासून त्यांची चर्चा सुरू झाली होती.
नेमकं प्रकरण काय? (Pooja More-Jadhav)
पूजा मोरे-जाधव यांनी पहलगाम हल्ल्यानंतर दिलेली प्रतिक्रिया आणि फडणवीसांवर केलेले टीका यावरून भाजप कार्यकर्ते संतापले होते, त्यावरून त्यांना मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात होते. या ट्रोलिंगनंतर पूजा यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर पूजा मोरे-जाधव यांच्या डोळ्यात पाणी आले. त्या माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की, माझा प्रवास खूप सामान्य घरातून झाला आहे. मी धनंजय जाधव यांच्याशी लग्न करून या पुण्यात राहायला आले. पोलिसांच्या लाठ्याकाठ्या खात शेतकऱ्यांसाठी गुन्हे अंगावर घेतले. कोर्टाच्या चकरा मारल्या. न्यायालयात खटले लढवायला माझ्याकडे पैसे नसायचे या परिस्थितीतून मी पुढे आली आहे. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला मोठ्या पक्षाची उमेदवारी मिळत नाही. ते भाग्य माझ्या नशिबात आले होते. या पक्षातून एखाद्या पदावर जात तळागाळातील लोकांसाठी न्याय देण्याचं काम मला करायचे होते. परंतु माझ्या आयुष्यात झालेल्या एका छोट्या चुकीचा मोठा बाऊ करून माझ्याविरोधात षडयंत्र करण्यात आले. त्याच्या मला वेदना होत आहेत, अशी भावना पूजा मोरे-जाधव यांनी व्यक्त केली.
अर्ज घेतो तेव्हा शवागारावर आहे, असे सांगितले, तो काय म्हणाला? (पूजा मोरे-झाव पुणे 2026)
आजचा दिवस माझासाठी अवघड आहे. 10-12 वर्षातला संघर्ष आठवतोय. मी गावातली मुलगी आहे. वडील ग्रामपंचायत सदस्य नाही. शेतकऱ्यांसाठी काम करत होते, मी शेतकऱ्यांची मुलगी आहे. शेतकऱ्यांसाठी आयुष्य झोकून दिलं. कमी वयात 5 गुन्हे अंगावर घेतले. मी महिलांचा आवाज बुलंद करण्याचं काम केलं. गुन्हे दाखल व्हायचे त्यावेळी शौचालयाच्या बाहेर झोपली आहे. बिन लग्नाची मुलगी होते, राजकारण घाणेरडं असतं असे सगळे म्हणतात, पण बापाने सगळं करू दिलं, लग्नानंतर नवी नवरी राहिली नाही, दुसऱ्या दिवशी कामासाठी बाहेर पडली, पहालगामच्या हल्ल्यावेळी काम केलं, 8 दिवस तिथं होतो. लाल चौकात आंदोलन केलं. दहशतवाद्यांना हिंदू मुस्लिम करायचं आहे असं समजून मी भूमिका मांडली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाले. प्रभाग 2 मधील अनेकांना माझ राजकारण सहन होत नाही, त्यांनी माझे व्हिडीओ बनवले. मुंबईत 20 व्या वर्षी मराठा समाजाच्या भावना मांडल्या. विरोधकांची प्रभागाची टीम आहे. त्याची व्हिक्टिम मी बनत आहे. राहुल गांधीचा व्हिडीओ व्हायरल होतोय. तेव्हा शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन मी राहुल गांधींकडे गेले होते, असं पूजा मोरे-जाधव म्हणाल्या.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.