राज ठाकरेंनी ठाण्यातून भाजपच्या गणेश नाईकांचं केलं कौतुक; म्हणाले, मला बरं वाटलं…

Raj Thackeray On मराठी ठाणे: मी उद्योगपतींच्या विरोधातला माणूस नाही. पण एकाच उद्योगपतीवर इतकी मेहरबानी का? हे विचारणारा माणूस आहे. प्रत्येकाची एक भाषा असते, प्रत्येकाचा एक स्वाभिमान असतो. आमच्या स्वाभिमानाला तुम्ही नख लावताय?, असं मनसेप्रमुख राज ठाकरे (मराठी) म्हणाले. काल ठाण्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरेंची (Raj Thackeray) सभा झाली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. विशेष म्हणजे राज ठाकरेंनी मंत्री आणि भाजपचे नेते गणेश नाईक  यांचं जाहीर सभेतून कौतुक केल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.

एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यातील वाद काही नवीन नाही. यातच ठाण्यातील सभेतून राज ठाकरेंनी गणेश नाईक यांचं कौतुक केलं. घोडबंदरची नॅशनल पार्कची 1000 एकर जमीन एका उद्योगपतीला विकत आहेत. ज्याला विकताय तो एकनाथ शिंदेंच्या ओळखीचा आहे. त्याला गणेश नाईकांनी विरोध केला. त्यामुळे मला बरं वाटलं, ही आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे गणेश नाईक यांचं अभिनंदन, असं राज ठाकरे म्हणाले.

कॉफी विथ कौशिकमध्ये देवेंद्र फडणवीसांचं राज ठाकरेंबाबत मोठं विधान- (Devendra Fadnavis On Raj Thackeray)

16 तारखेनंतर आम्ही एकत्रित चहा पिताना दिसलो तर त्याला फिक्सिंग म्हणू नका असं वक्तव्य करत मुख्यमंत्र्यांनी खळबळ उडवून दिलीय. कॉफी विथ कौशिक या एबीपी माझाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.मनसे अध्यक्ष राज ठाकरेंबाबत मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केल्यानं सर्वांनाच भुवया उंचावल्यात. आमचे विचार वेगळे असले तरीही आम्ही एकमेकांचे शत्रू नाही, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी राजकारणात कुणीही कुणाचा कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्र नसतो हेच सांगण्याचा प्रयत्न केला. तर त्याचवेळी त्यांनी उद्धव ठाकरे आपल्या इगोसाठी काहीही करु शकतात असं म्हणत त्यांना लक्ष्य केलंय. यामुळे उद्धव ठाकरेंना टाळी देत मुंबई आणि इतर महत्वाच्या महानगरपालिकांमध्ये शिवसेनेसोबत जाणाऱ्या राज ठाकरेंची महापालिका निवडणुकीनंतर नेमकी काय भूमिका असणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

संबंधित बातमी:

Raj Thackeray On Gautam Adani: अदानींवर टीका करताच भाजपने फोटो काढला; आता राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, माझ्या घरी…

Devendra Fadnavis on Adani: गौतम अदानींच्या साम्राज्याचा इतका झपाट्याने विकास का झाला? देवेंद्र फडणवीसांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर, म्हणाले…

आणखी वाचा

Comments are closed.