मुंबईत भाजपला 90 अन् शिवसेनेला 40 जागा मिळतील, तर पुण्यात…; चंद्रकांत पाटलांचा मोठा दावा

पुनालियाकलिस 2026 : पुणे महापालिका निवडणुकीसाठी (Pune Mahanagarpalika Election) आज (दि. 15) सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून, या पार्श्वभूमीवर भाजपचे (BJP) नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मोठा राजकीय दावा करत निवडणूक निकालांबाबत आत्मविश्वास व्यक्त केला आहे. मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), पुण्यासह (Pune) सहा महापालिकांमध्ये भाजपचा विजय निश्चित असल्याचे पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “2014 साली नरेंद्र मोदीजी देशाचे पंतप्रधान होईपर्यंत प्रचाराचा आरोप प्रत्यारोपाचा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह परिणाम व्हायचा. 2014 साली नरेंद्र मोदी (Narendra Modi) पंतप्रधान झाले, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री झाले. पाच वर्षांमध्ये विकासावर आणि चेहऱ्यावर परिणाम दिसले, त्यामुळे आता होत असलेले आरोप फक्त बुडबुडे आहेत.  मोदींचे चिन्ह कमळ असो की मोदींचा चेहरा, लोकांचा विश्वास एकसारखा आहे, असे त्यांनी म्हटले.

Pune Mahangarpalika Election 2026 : पुण्यात 115 पेक्षा कमी जागा नाहीत

पुणे महापालिकेबाबत बोलताना पाटील यांनी अत्यंत ठाम भूमिका मांडली. “गणेश बिडकर आणि आमचे इतर सहकारी प्रभाग क्रमांक 24 मध्ये मोठ्या मार्जिनने विजयी होतील. पुण्यात 115 जागांना तर आमच्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. ज्यांना पैजा लावायच्या असतील त्यांनी खुशाल लावाव्यात,” असे आव्हानात्मक विधान त्यांनी केले. मुंबई महापालिकेच्या निवडणुकांबाबतही चंद्रकांत पाटील यांनी आकडेवारीसह दावा केला. “मुंबईत भाजप 90 जागा आणि शिवसेना 40 जागा मिळवेल. मुंबईठाणे-पुण्यासह एकूण सहा महापालिकांमध्ये भाजपचा विजय निश्चित आहे,” असे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

Pune Mahangarpalika Election 2026 : आमची पार्टी लोकशाही मानणारी

दरम्यान, अजित पवार यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर पाटील म्हणाले की. “आमची पार्टी तुटलेली नाही. आमची पार्टी लोकशाही मानणारी आहे. मात्र राज्यातील काही नेत्यांच्या ओव्हर कॉन्फिडन्स आणि उर्मटपणामुळे आम्ही काही काळ बॅकफूटवर गेलो होतो,” असे त्यांनी स्पष्ट केले. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर आता मतदारांचा कौल नेमका कोणाच्या बाजूने जातो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Tejasvee Ghosalkar BMC Election 2026: मतदानाला जाताना नवऱ्याचा फोटो बघून तेजस्वी घोसाळकरांना रडू फुटलं, म्हणाल्या, ‘आज अभिषेकची खूप आठवण येतेय’

Pune Municipal Election 2026: पुण्यातील प्रभाग क्रमांक 26 मध्ये ईव्हीएम बंद, मशीनवरील सिक्वेन्स चुकल्याचा उमेदवारांचा आक्षेप

आणखी वाचा

Comments are closed.