मुख्यमंत्र्याच्या मित्रावर हल्ला, निवडणुकीची धामधुमीत देवेंद्र फडणवीस भूषण शिंगणेंच्या भेटीला
नागपूर बातम्या: भाजप उमेदवार भूषण शिंगणे यांच्यावर हल्ला फक्त एका कार्यकर्त्यावरचा हल्ला नाही. तर कुठल्याही कार्यकर्त्यावर हल्ला झाला असता तरी मी त्याच्या घरी गेलो असतो. शिंगणे माझे मित्रही आहेत. फक्त अशी गुंडगिरी खपून घेतली जाणार नाही, प्रकरणाची दखल मी घेतली आहे. निश्चित ठोस कारवाई केली जाईल. शिवाय पोलिसांनीही यामध्ये काही हलगर्जी केल्याचे दिसून येत आहे. गिट्टीमाझे पोलीस स्टेशनमध्ये कालच या संदर्भात एक तक्रार दुपारी देण्यात आली होती. मात्र त्याकडे लक्ष देण्यात आले नाही. त्या संदर्भातही कारवाई होईल. अशी अभिप्राय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय.
Nagpur Municipal Election 2026 : भाजप उमेदवार भूषण शिंगणें घातक हल्लाकाँग्रेसवर दोष
भाजप उमेदवार भूषण शिंगणें प्राणघातक हल्ला, काँग्रेसवर दोष नागपुरातील महापालिका निवडणुकीच्या पूर्वसंध्येलाच हिंसक वळण लागलं असून शहरात रक्तरंजित राडा झाला आहे. नागपुरात भाजप उमेदवारवर जीवघेणा हल्ला झाला आहे. प्रभाग 11चे भाजप उमेदवार भूषण शिंगणे हे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहे. त्यांना नागपूरच्या मेयो या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रभाग 11 मधील काँग्रेस उमेदवार आणि त्याच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी हा जीवघेणा हल्ला केल्याचा भाजपचा आरोप आहे. या हल्ल्यात भूषण शिंगणे यांच्या चेहऱ्यावर आणि नाकावर जोरदार मार लागला असून हात फ्रॅक्चर झाला आहे
देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंवर मुंबईत ठाकरे बंधूंच्या ‘भगवा गार्ड’वरून मुखयमंत्र्यांची थेट इशारा
राज ठाकरे (Raj Thackeray) जी कोणती ब्रिगेड बनवली आहे ती काही निवडक ठिकाणीच दिसते ती मालवणी (मुस्लिम बहुल) भागात दिसत नाही. ते बोगस वोटिंग सिलेक्टिव्ह भागामध्येच शोधत आहे का. त्यांची ही दहशत सिलेक्टिव्ह स्वरूपाची आहे. मात्र मुंबईत अशी कोणाचीही दहशत चालणार नाही, पोलीस ते ठेचून काढतील. मुंबईसह पूर्ण महाराष्ट्रात कोणाचीही अशी दहशत चालू दिली जाणार नाही. असे म्हणत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोगस वोटिंग रोखण्याच्या नावाखाली नियम ठाकरे आणि मनसे प्रणित भगवा ब्रिगेडला थेट उत्तर दिलं आहे. ते नागपुरात बोलत होते.(मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026)
Devendra Fadnavis : मतदान कमी झाले पाहिजे त्यासाठीचे हे प्रयत्न
तुम्हाला एक सांगतो हे काय दहशत निर्माण करतील, यांच्यात काय क्षमता राहिली आहे आणि कोणी दहशत निर्माण केली तर पोलीस ठोकून काढतील. मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्र१त्यामुळे अशी दहशत ठेचून काढू. असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. दुबार मतदाराबाबत त्यांना काय माहिती आहे? दुबार मतदार शोधण्याचे काम निवडणूक आयोगाने केले आहे. यांचा पोलिंग एजंट आतमध्ये बसून आहे, त्यांनी दुबार मतदार शोधला पाहिजे. मतदान कमी झाले पाहिजे त्यासाठीचे हे प्रयत्न आहेत. असेही ते म्हणाले.
आणखी वाचा
Comments are closed.