महापालिकेनंतर आता मुख्यमंत्री जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठीही मैदानात, 7 दिवसात घेणार 22 सभा
मुंबई : राज्यात नुकत्याच 29 महानगर पालिकांच्या निवडणुका पार पडल्या आहेत. त्यानंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. या निवडणुकांच्या निमित्ताने राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सर्वच राजकीय पक्षाचे नेते मैदानात उतरले आहेत. अशातच आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा प्रचार करणार आहेत.
28 जानेवारी ते 3 फेब्रुवारीपर्यंत प्रत्येक जिल्हा परिषद असलेल्या जिल्ह्यात मुख्यमंत्री सभा घेणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मैदानात उतरणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 12 जिल्हा परिषद निवडणुकीत प्रचार सभा घेणार आहेत. 28 जानेवारी ते 3 फेब्रुवारीपर्यंत प्रत्येक जिल्हा परिषद असलेल्या जिल्ह्यात सभा घेणार आहेत. 28 तारखेला रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभा पार पडणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मुख्यमंत्री सात दिवसांत एकूण 22 सभा घेणार आहेत. महापालिकेनंतर जिल्हा परिषद काबीज करण्यासाठी भाजपचा जोर वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी सभा घेणार असल्यानं भाजपच्या नेत्यांना बळ मिळणार आहे.
5 फेब्रुवारीला जिल्हा परिषदेसाठी मतदान होणार तर 7 फेब्रुवारीला निकाल लागणार
महानगरपालिकेची रणधुमाळी संपते ना संपते तोच आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी वातावरण तापणार आहे. महानगरपालिकांपेक्षाही जिल्हा परिषद निवडणुकांचा राजकीय धुरळा अधिक उडतो. त्यामुळे या निवडणुकांसाठी राजकीय पक्ष काय काय आराखाडे करतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. राज्यात सध्या 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समितीच्या निवडणुका प्रलंबित आहेत. यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्यकाळ संपलेला आहे त्यामुळे या संस्थांचा कारभार प्रशासनाकडे आहे. मात्र 50 टक्के आरक्षणाची मर्यादा उलडलेल्या राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका तात्पुरत्या स्थगित करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत त्यामुळे आता केवळ 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदेसाठी आणि पंचायत समित्यांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून 5 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान पार पडणार आहे. तर मतमोजणी दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी 1 जुलै 2025 ची मतदार यादी वापरण्यात येणार आहे. 13 जानेवारीपासून निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झालेली आहे.
महत्वाच्या बातम्या:
ZP Election 2026: जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांपूर्वी पुण्यात प्रकाश शेंडगेंची मोठी घोषणा, ओबीसींच्या नव्या आघाडीची घोषणा, कुठे-कुठे लढणार?
आणखी वाचा
Comments are closed.