मुंबई महानगरपालिकेत महापौरपद कोणाला, भाजप-शिंदेंच्या शिवसेनेला काय काय मिळणार?; पाहा A टू Z मा

BMC महापौर भाजप-शिवसेना शिंदे गट: मुंबईच्या महापौरपदासाठी आज चक्राकार पद्धतीने आरक्षण सोडत (BMC Mayor 2026) काढण्यात येणार आहे. गेल्या वेळी या पदासाठी अनुसूचित जाती महिला आणि खुला प्रवर्गासाठी आरक्षण पडले होते. त्यामुळे कुठल्या आरक्षणाचे पक्षनिहाय किती नगरसेवक विजयी झाले आहेत, याचा लेखाजोखा राजकीय पक्ष तयार करत आहेत. आरक्षण निश्चित झाल्यानंतर महापौरपदासाठी कुणाला संधी देता येईल, याबाबतच्या हालचालींना वेग येणार आहे. त्याआधी एक महत्वाची माहिती समोर आली आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीत (Mumbai Municipal Corporation Election 2026) बाजी मारलेल्या भाजप-शिवसेना शिंदेंच्या पक्षांमध्ये पालिकेतील महत्वाच्या पदांबाबत अंतिम वाटाघाटी जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेकडून भाजपकडे महापौर किंवा स्थायी समिती अध्यक्षपदाची मागणी केली जात आहे. तर महत्वाच्या समित्यांपैकी शिवसेनेकडून सुधार किंवा शिक्षण समितींची मागणी केली जात आहे. दरम्यान या वाटाघाटीत मुंबईत महापौर हा भाजपचा बसल्यास शिंदेंच्या शिवसेनेला स्थायी समिती अध्यक्षपद दिले जाण्याची शक्यता आहे. तर भाजपकडून सुधार समिती, बेस्ट आणि आरोग्य समिती स्वत:कडे ठेवली जाणार असल्याचे कळते. तर त्या बदल्यात शिवसेनेला शिक्षण, विधी, बाजार, उद्यान समिती दिली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. (BJP-Shivsena Shinde)

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमध्ये बैठक होणार- (Ekanth Shinde-Devendra Fadnavis BMC Election 2026)

राज्यातील स्थिर सरकार पाहता, पालिकेत शिवसेनेला सन्मानाने पद देऊन युतीत कुठेही मिठाचा खडा पडणार नाही, याची काळजी भाजपकडून घेतली जात आहे. दिल्लीतील भाजप शिवसेनेच्या नेत्यांमधील बैठकीनंतर आता लवकरच मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात  अंतिम बैठक होणार आहे. या बैठकित मुंबईसह कल्याण-डोंबिवली, ठाणेउल्हासनगर या 4 पालिकांवर चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहीती आहे.

मुंबई महापालिकेचा अंतिम निकाल-(BMC निवडणूक निकाल 2026)

भाजप – 89
शिवसेना ठाकरे गट – 65
शिवसेना – 29
काँग्रेस – 24
मनसे – 6
एमआयएम- 8
राष्ट्रवादी-3
एसपी-2
राष्ट्रवादी शप – १
————-
एकूण- 227

संबंधित बातमी:

BMC Mayor Reservation 2026: मुंबईतील ठाकरेंच्या दोन हुकमी एक्क्यांवर सत्ताधाऱ्यांची नजर; कोण आहेत ते नगरसेवक, नेमकं कारण काय?

आणखी वाचा

Comments are closed.