महायुतीतील राज्यसभेची चौथी जागा शिवसेनेच्या की भाजपच्या पथ्यावर? सर्वाधिक कोणाकडे अधिकची मते? क
मुंबई: महायुतीतील राज्यसभेची चौथी जागा सेनेच्या की भाजपच्या पथ्यावर (Rajya Sabha elections 2026) पडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. महायुतीत भाजपचे अपक्षांसहीत १३६ आमदार तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे एकूण ५६ आमदार आहेत.सध्याच्या संख्याबळानुसार (Rajya Sabha elections 2026) भाजपच्या केवळ ३ जागा निवडून येणार तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची केवळ १ जागा निवडून येणार आहे. भाजपकडे अधिकची १६ मतं तर शिवसेनेकडे अधिकची तब्बल १८ मतं आहेत. शिवसेना अधिकची १८ मतं भाजपला देणार की भाजप अधिकची १६ मतं शिवसेनेला देणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.(Rajya Sabha elections 2026)
महायुतीतील राज्यसभेची चौथी जागा शिवसेनेला की भाजपला हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. महायुतीमध्ये भाजपचे अपक्षांसह असे 136 आमदार आहेत, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 56 आमदार आहेत. सध्याच्या संख्याबळानुसार भाजपच्या केवळ तीन जागा निवडून येणार आहेत, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या एक जागा निवडून येणार आहे. भाजपकडे अधिकची 16 मतं आहेत. तर शिवसेनेकडे अधिकची 18 मतं आहेत. शिवसेना ही आपल्याकडे असलेली अधिकची 18 मतं भाजपला देणार की भाजपच आपल्याकडे असलेली 16 अधिकची मतं शिवसेनेला देणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.(Rajya Sabha elections 2026)
आता राज्यसभेच्या जवळपास सात जागा खाली आहेत, त्यातील सहा जागा या महायुतीला मिळण्याची दाट शक्यता आहे. यामधील चौथी जागा कोणाला मिळणारी याबद्दल वाद होण्याची शक्यता आहे. महायुतीमध्ये भाजपाकडे अधिकची 16 मत आहेत, तर शिवसेनेकडे अधिकची 18 मते आहेत. त्यामुळे आता महायुतीमध्ये चौथी जागा ही भाजपला सुटणार की शिवसेनेला हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या जागेवरून आता भविष्यामध्ये काय निर्णय होतो. ते लवकरच समजेल. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा मिळणार हे निश्चित आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीला एक जागा मिळणार असल्याचं स्पष्ट चित्र आहे, तर राहिलेल्या चौथा जागेवरून वाद होण्याची शक्यता आहे.(Rajya Sabha elections 2026)
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक जाहीर
भारत निवडणूक आयोगाने 10 राज्यांमधील रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या 37 जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील सात जागांचा समावेश आहे. या सात जागांसाठी 16 मार्च 2026 रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान आणि त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता मतमोजणी होणार आहे.
या सदस्यांची मुदत 2 एप्रिल 2026 रोजी संपणार
महाराष्ट्रातील डॉ. भागवत किशनराव कराड, डॉ. फौजिया तहसीन अहमद खान, प्रियंका विक्रम चतुर्वेदी, शरदचंद्र गोविंदराव पवार, धैर्यशील मोहन पाटील, रजनी अशोकराव पाटील आणि रामदास बंडू आठवले या सदस्यांची मुदत 2 एप्रिल 2026 रोजी संपणार असल्याने भारत निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या या सात जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे.
निवडणुकीची अधिसूचना गुरुवार, 26 फेब्रुवारी 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार
या निवडणुकीची अधिसूचना गुरुवार, 26 फेब्रुवारी 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून यासाठी नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक 5 मार्च 2026 असा आहे. या नामनिर्देशन पत्रांची छाननी शुक्रवार, 6 मार्च 2026 रोजी करण्यात येईल तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 9 मार्च 2026 आहे. निवडणुकीसाठीचे मतदान सोमवार, 16 मार्च 2026 रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत होणार असून याच दिवशी सायंकाळी 5 वाजता मतमोजणी सुरू होईल. ही निवडणूक प्रक्रिया शुक्रवार, 20 मार्च 2026 रोजी पूर्ण होईल, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील 7 जागांसाठी होणारी ही निवडणूक राजकीयदृष्ट्या महत्त्वाची
राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून सर्वाधिक 7 जागांसाठी निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रातील 7 जागांसाठी होणारी ही निवडणूक राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. विधानसभेतील पक्षीय संख्याबळाच्या पार्श्वभूमीवर कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याचदरम्यान, एक महत्वाची माहिती समोर आली आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, अर्ज भरण्याची अंतिम तारीख 5 मार्च निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर 6 मार्च रोजी अर्जांची छाननी केली जाईल. उमेदवारांना माघार घेण्यासाठी 9 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मतदानाची प्रक्रिया 16 मार्च रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत पार पडणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार असून निकाल त्यानंतर जाहीर केले जातील. (Rajyasabha Election 2026)
विधानसभेचे आमदार 286
अजित पवार आणि शिवाजी कर्डिलेंच्या निधनाने 2 जागा रिक्त
कोटा = एकूण आमदार (286) भागीले रिक्त जागा 7 + 1 याच्या उत्तरात + 1 मिळवायचे.
म्हणजेच = 286 / 8 =35.75
35.75 + 1 = 36.75
राज्यसभेवर निवडून येण्यासाठी उमेदवाराला 36.75 म्हणजेच 37 मते मिळायला हवीत.
कोणाचे संख्याबळ किती? (Maharashtra BJP Shivsena NCP Congress MLA)
भाजप- 132 – 1 = 131
शिवसेना (शिंदे गट)- 57
राष्ट्रवादी (अजित पवार गट)- 41 – 1 = 40
काँग्रेस- 16
राष्ट्रवादी (शरद पवार गट)- 10
शिवसेना (ठाकरे गट)- 20
समाजवादी पक्ष- २
जनसुराज्य शक्ती- 2
राष्ट्रीय युवा स्वाभीमान पार्टी- 1
राष्ट्रीय समाज पक्ष- रासप- 1
एमआयएम- 1 जागा
सीपीआय (एम)- 1
पिजन्ट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इँडिया- पीडब्ल्यूपीआय- 1
राजर्षी शाहू विकास आघाडी- 1 (राजेंद्र यड्रावकर)
अपक्ष- 2 (शिवाजी पाटील आणि शरद सोनावणे)
महायुती = 131 + 57 + 40 + 2 + 1+1 + 2= 234 (2 आमदारांचं निधन)
माविया = 16+10+20+2+1 = 49
इतर = 03
एकूण = 286
कुणाचे किती खासदार निवडून येऊ शकतात? (Mahavikas Aghadi vs Mahayuti)
भाजपकडे 131 + 1 अपक्षाचा पाठिंबा असे 132 आमदार
जर एक खासदार निवडण्यासाठी 37 मतांची गरज असेल तर 132/37 = 3.56
म्हणजे एकट्या भाजपचे 3 ते 4 खासदार निवडून येऊ शकतात.
शिवसेना शिंदे = 57 + 1 अपक्षाचा पाठिंबा असे 58 आमदार
जर एक खासदार निवडण्यासाठी 37 मतांची गरज असेल तर 58/37 = 1.56
म्हणजे एकट्या शिंदेसेनेचा 1 खासदार निवडून येऊ शकतो.
शिंदेंकडे 20 मते अतिरिक्त असतील.
राष्ट्रवादी (अजित पवार गट)- 41 – 1 = 40
जर एक खासदार निवडण्यासाठी 37 मतांची गरज असेल तर 40/37 = 1.08
म्हणजे एकट्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा 1 खासदार निवडून येऊ शकतो.
राष्ट्रवादीकडे 3 मते अतिरिक्त असतील.
मविआचे किती खासदार निवडून येऊ शकतात? (How many MPs Elected From Mahavikas Ahadi)
काँग्रेस- 16 +राष्ट्रवादी (शरद पवार गट) 10 + शिवसेना (ठाकरे गट)- 20 = 46
मविआला पाठिंबा देणारे छोटे पक्ष = सपा 2 + माकप 1 = 3
मविआकडे 46+3 = 49 आमदारांचं बळ
जर एक खासदार निवडण्यासाठी 37 मतांची गरज असेल तर 49/37 = 1.32
म्हणजे मविआमध्ये सर्व पक्षांचा मिळून 1 खासदार निवडून येऊ शकतो.
त्याउलट महायुतीमध्ये भाजपचे 3, शिंदेसेनेचा 1 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा 1 आणि अतिरिक्त मतांवरुन 1 असे 6 खासदार आरामात निवडून येतील
आणखी वाचा
Comments are closed.