नाशिकमध्ये घडलेल्या संस्कृती काळे प्रकरणात मोठी अपडेट; प्रियकरानेच केला घात, घटनेचा CCTV समोर
नाशिक क्राईम न्यूज : नाशिकमध्ये घडलेल्या अल्पवयीन मुलीच्या खून प्रकरणात काही CCTV फुटेज आता ‘एबीपी माझा’च्या हाती लागले आहते. संस्कृती काळे हिची तिच्याच प्रियकराने हत्या केल्याचं तपासात उघड झालं होतं. दरम्यान, संस्कृती काळे ही मुळ बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी असून ती अकोल्यात एका खाजगी शिकवणीत्यामुळे अर्थातच कोचिंग क्लासेससाठी राहत होती. 19 फेब्रुवारी रोजी तिचा मित्र अथर्व देशमुख आणि त्याच्यासोबत दोन मित्र तिला भेटण्यासाठी अकोल्यात आले होते, अकोल्यातील एका कॅफेमध्ये दोघे जण भेटले. इथे अर्थवचा मित्र देखील उपस्थित होता. जवळपास कॅफेमध्ये 17:50 वाजता त्यांनी कॅफेत एन्ट्री केली, तर 18:42 ला कॅफेमधून बाहेर पडले होते. त्यानंतर ते एका कारने पुढील प्रवासासाठी रवाना झाले.
नाशिक क्राईम न्यूज : संस्कृती हरवल्याची तक्रार, आता या प्रकरणातपर्यंत 3 जणांना अटक
मात्र वाटेतच दोघांमध्ये संस्कृती आणि अथर्व यांच्यात वाद झाला. याच दरम्यान संस्कृतीने अथर्वच्या कानशिलात लगावली. त्यानंतर अथर्वने रागाच्या भरात घातक शस्त्राने तिच्या गळ्यावर वार केला होता. ती गंभीर जखमी झाली. हे सर्व पाहणारे दोघे मित्र गाडीतून खाली उतरून गेले. दरम्यान, अथर्वने नाशिक जिल्ह्यातील सारुळ येथील जंगल परिसरात 20 फेब्रुवारीच्या रात्री संस्कृती चा मृतदेह फेकून दिला होता. या प्रकरणात आतापर्यत 3 जणांना अटक केली असून यात आणखी काही आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता आहे. दरम्यान, संस्कृती ही बेपत्ता असल्याची तक्रार अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात दाखल होती. त्यांनंतर आता या प्रकरणाची सत्यता समोर आली आहे.
नाशिक क्राईम न्यूज : इतरांशी बोलताना पाहून राग येतो
चौकशीत अथर्वने दिलेल्या माहितीनुसार, संस्कृती आणि त्याचे प्रेम संबंध होते. मात्र तिला दुसऱ्या मुलासोबत पाहिल्याने त्याला राग अनावर झाला. त्यातूनच त्याने खुनाचा कट रचल्याची माहिती समोर आली आहे. अथर्व नाशिकमधील एका महाविद्यालयात शिक्षण घेतो, तर संस्कृती अकोला जिल्ह्यात शिक्षण घेत होती. महाविद्यालयाला सुट्टी असल्याने अथर्व बुलढाण्यात घरी गेला होता. त्याने मित्रासोबत फिरायला जाण्याचे कारण सांगत संस्कृतीला कारमध्ये बसवले. दरम्यान दोघांमध्ये वाद झाला आणि त्यातूनच त्याने गाडीतच तिच्यावर चाकूने वार करून खून केल्याचे समोर आले.
Nashik Crime News: काही तासांत पोलिसांनी उलगडले गूढ
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक भगवान मथुरे आणि त्यांच्या पथकाने तपास सुरू केला. अत्यंत बारकाईने तपास करत पोलिसांनी अवघ्या काही तासांत खुनाचा उलगडा केला आणि आरोपीला अटक केली. या घटनेमुळे नाशिक जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून प्रेमसंबंधातून घडलेल्या या खुनामुळे पुन्हा एकदा तरुणांमधील गुन्हेगारी प्रवृत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
आणखी वाचा
Comments are closed.