शिंदेंची शिवसेना स्वीकृत नगरसेवकासाठी तीन नावं देणार, दोन उमेदवार निश्चित पण एक डमी फॉर्म भरणार

BMC Swikrut Nagarsevak: बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये (Mumbai Municipal Corporation) स्वीकृत नगरसेवकपदासाठी राजकीय हालचाली वेगाने सुरू असून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून (Shiv Sena) तीन नावांचे अर्ज दाखल केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी दोन उमेदवार निश्चित असून एक अर्ज डमी म्हणून भरला जाणार आहे.

शिवसेना पक्षातील सूत्रांच्या माहितीनुसार, या तीन नावांमध्ये आमदार प्रकाश सुर्वे यांचे सुपुत्र राज सुर्वे यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. याशिवाय उमेश माने आणि बाळकृष्ण ब्रीद यांच्या नावांचाही समावेश असल्याची चर्चा आहे. अर्ज दाखल करण्यासाठी आमदार प्रकाश सुर्वे सकाळपासूनच मुंबई महापालिकेत उपस्थित असल्याचेही सांगितले जात आहे.

बीएमसी स्वकृत नगरसेवक: डॉन जगनसाथी तीन अर्ज

शिंदे गटाच्या शिवसेनेकडे असलेल्या संख्याबळानुसार पक्षाच्या वाट्याला दोन स्वीकृत नगरसेवकपदे येत आहेत. त्यामुळे पक्षाकडून तीन अर्ज भरले जाणार असून त्यापैकी एक अर्ज डमी उमेदवाराचा असणार आहे. डमी उमेदवार नेमका कोण असेल, याबाबत पक्षाकडून अधिकृत पत्रक काढून घोषणा केली जाणार असल्याचे कळते.

BMC Swikrut Nagarsevak: मागाठाणे मतदारसंघातील नावांची चर्चा

शिवसेना वर्तुळात चर्चेनुसार स्वीकृत नगरसेवकपदासाठी विचाराधीन दोन्ही प्रमुख नावे मागाठाणे विधानसभा मतदारसंघाशी संबंधित आहेत. यामध्ये माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद आणि राज सुर्वे यांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे. पालिका निवडणुकीदरम्यान कागदपत्रांच्या त्रुटीमुळे बाळकृष्ण ब्रीद यांना उमेदवारी अर्ज दाखल करता आला नव्हता. त्यामुळे आता पक्षाकडून त्यांना संधी मिळू शकते, अशी चर्चा होती.

BMC स्वीकृत नगरसेवक: सुर्वे कौटुंबिक करार?

पालिका निवडणुकीच्या वेळी मागाठाणे मतदारसंघातून आपल्या मुलाला उमेदवारी मिळावी यासाठी आमदार प्रकाश सुर्वे आग्रही होते. मात्र भाजप-शिवसेना युतीतील जागावाटपाच्या समीकरणांमुळे त्यांना तिकीट मिळाले नव्हते. त्यामुळे आता त्यांची नाराजी दूर करण्यासाठी राज सुर्वे यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी दिली जाऊ शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

BMC Swikrut Nagarsevak: समित्यांमध्येही शिंदे सेनेला संधी

मुंबई महापालिकेतील चार वैधानिक समित्यांपैकी बेस्ट आणि सुधार या दोन समित्यांचे अध्यक्षपद शिंदे गटाच्या शिवसेनेकडे गेले आहे. सुधार समितीसाठी नगरसेविका संध्या दोषी, तर बेस्ट समितीसाठी नगरसेविका तृष्णा विश्वासराव यांच्या नावांची निवड करण्यात आली आहे. या दोन्ही समित्यांच्या अध्यक्षांची निवड बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

BMC Swikrut Nagarsevak: मुंबई महापालिकेतील पक्षीय बलाबल

अलीकडील निवडणुकीत भाजपचे 89, शिंदे गटाच्या शिवसेनेचे 29, शिवसेना ठाकरे गटाचे 65 नगरसेवक निवडून आले आहेत. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 6, काँग्रेसचे 24, एमआयएमचे 8, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे 3, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 1 आणि समाजवादी पक्षाचे 2 नगरसेवक महापालिकेत निवडून आले आहेत. दरम्यान, स्वीकृत नगरसेवकपदासाठी अर्ज दाखल होताच अधिकृत उमेदवारांची घोषणा होणार असल्याने महापालिकेतील राजकीय हालचालींना अधिक वेग येण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा

मराठी Speech on Ajit Pawar: दादा तुमचा निर्णय चुकला, माघारी या, मी माझा मोठा भाऊ गमावला; अजित पवारांच्या आठवणी सांगताना एकनाथ शिंदे गहिवरले

आणखी वाचा

Comments are closed.