मंत्री बावनकुळेंनी कानाला फोन लावला, म्हणाले, ‘हॅलो अजितदादा, अर्थसंकल्प सादर करायचाय, वापस या

पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. त्या घटनेला महिना होत आला. या घटनेनंतर महाराष्ट्रावर शोककळा पसरली, अजित पवार त्यांच्या पक्षातील नेत्यांच्याच नव्हे तर इतरही पक्षातील नेत्यांशी मंत्र्याशी मिळून मिसळून वागत, बोलत, एकत्र काम करत, त्यांच्या जाण्याने राज्याची मोठी हानी झाली आहे, अशातच आज पुण्यातल्या मुलाखतीत भाजप नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना आवडत्या व्यक्तीला फोन करायला सांगितला आणि त्यांनी थेट अजित पवारांना फोन फिरवला. पुण्यात मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule)यांनी इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो मध्ये झालेल्या मुलाखतीत थेट अजित पवार यांना फोन लावला. या मुलाखतीत त्यांना जवळच्या व्यक्तीला फोन करण्यासाठी सांगितलं असता त्यांनी अजित पवार यांना फोन लावण्याची पसंती दर्शवली आणि त्यांना फोन करून आदरणीय अजित दादा परत या अर्थसंकल्प सादर करायचा आहे, महाराष्ट्राची जनता तुमची वाट बघत आहे. असं संभाषण त्यांनी अजित पवार यांच्याशी फोनवरून केलं.

इंटरनॅशनल बिझनेस एक्सपोमधील मुलाखती वेळी चंद्रशेखर बावनकुळे यांना आवडत्या व्यक्तीला फोन लावा असं म्हटलं गेलं, त्यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी फोन कानाला लावला आणि म्हणाले, हॅलो आदरणीय अजित दादा अर्थसंकल्प सादर करायचा आहे, वापस या ना, अजित दादा परत यांना महाराष्ट्राचे जनता वाट पाहत आहे, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

अजित पवारांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे. अजित पवार मुंबईहून बारामतीमध्ये येत असताना 28 जानेवारी रोजी विमानाचा भीषण अपघात झाला. विमान लँडिग होतानाच अपघातग्रस्त झाले. अपघातानंतर विमान जळून खाक झाले होते. (Ajit Pawar Plane Crash)

विमानात कोण कोण होतं?

अजित पवार
विदीप जाधव
पिंकी माळी
कॅप्टन सुमित कपूर
कॅप्टन शांभवी पाठक

आणखी वाचा

Comments are closed.