छत्तीसगडमधील अल्पवयीन मुलीचे तरूणासोबत प्रेमसंबंध; डिलिव्हरी आली, डॉक्टरनं हेरलं अन् पैशांची मा
भंडारा : उपचारासाठी दाखल असलेल्या एक नव्हे तर, दोन बाळाला (Baby Selling Case) भंडाऱ्यात विकल्याचा धक्कादायक प्रकार भंडारा-गोंदियात उघडकीस आला आहे. यामुळं संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी १० सदस्यीय एसआयटी गठीत केली आहे. एसआयटीच्या सखोल चौकशी दरम्यान आता गोंदियाच्या डॉक्टर नितेश बाजपेयीचे नवनवे कारनामे समोर येत आहे. (Baby Selling Case)
आतापर्यंत या डॉक्टरनं दोन बाळांची (Baby Selling Case) भंडाऱ्यात विक्री केल्याचं निष्पन्न झालं असून मुख्य आरोपी असलेल्या डॉक्टर नितेश बाजपेयीसह सहा जणांना अटक केली आहे. यात आणखी एका आरोपीला अटक केली असून आता बाळ विक्री प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची संख्या आता सात वर पोहचली आहे. तर, डॉक्टर बाजपेयी याने जे दोन बाळ भंडाऱ्यात विकले, त्यातील एक बाळ हे मोहगाव देवी येथील दांपत्याला ४ लाख ७० हजारांत विकलं असल्याचं समोर आलं आहे. (Baby Selling Case)
या प्रकरणात समोर आलेली धक्कादायक माहिती
या बाळाची माता ही १७ वर्षांची अल्पवयीन असून तिचा प्रियकर हा २२ वर्षीय मुकेशकुमार मनसुरे हा आहे. हे दोघेही छत्तीसगड मधील बस्तर इथं एका ठिकाणी कामावर असताना या दोघांमध्ये प्रेमप्रकरण रंगल. या प्रेम प्रकरणातून जन्मास आलेल्या या बाळाची डॉक्टर बाजपेयीच्या गोंदियाच्या रुग्णालयात डिलिव्हरी करण्यात आली. डिलिव्हरीसाठी आलेली माता ही अल्पवयीन असल्याचं हेरून या डिलिव्हरीसाठी डॉक्टर बाजपेयीनं बाळाच्या मातापित्याकडे साडेचार लाख रुपयांची मागणी केली होती.(Baby Selling Case)
मात्र, त्यांच्याकडे तेवढी रक्कम नसल्यानं एक लाख वीस हजार रुपये डॉक्टर बाजपेला देऊन त्यांनी डिलिव्हरी केली. त्यानंतर त्या बाळाला डॉक्टर बाजपेयीकडे सोडून तिथून दोघेही निघून गेलेत. यानंतर हे बाळ डॉक्टर बाजपेयी यानं भंडाऱ्याच्या मोहगाव देवी येथील दांपत्याला विकल्याचं (Baby Selling Case) पोलीस तपासात समोर आलं. या प्रकरणात अल्पवयीन मुलीला माता बनविणाऱ्या मुकेशकुमार मनसुरे याला पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे या बाळ विक्री (Baby Selling Case) प्रकरणात आतापर्यंत सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान बाळ विक्री (Baby Selling Case) प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. यामुळे आता आरोपींची संख्या सातवर पोहचली आहे.
आणखी वाचा
Comments are closed.