साहेब, इकडे या.. भरत गोगावलेंचा आवाज; ठाकरे म्हणाले, नको, इथेच बरंय; रश्मी ठाकरेही बघत बसल्या
मुंबई : राज्यात शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर 40 पेक्षा जास्त आमदार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सोडून एकनाथ शिंदेंसोबत जाणे पसंत केले. तेव्हापासून शिवसेनेत दोन गट पडले असून दोन शिवसेना पक्षही निर्माण झाले आहेत. मात्र, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा संवाद मात्र तेव्हापासून कायमचा बंद झाला आहे. शिवसेनेचे आमदारही उद्धव ठाकरेंपासून दुरावले असून अबोला प्रकर्षणाने जाणवतो. मात्र, आजही उद्धव ठाकरेंबद्दलचा त्यांचा आदर कधी कधी पाहायला मिळतो. शिवसेना आमदार भरत गोगावले (Bharat gogawale) यांच्यातील ओझरत्या भेटीचा क्षणही याचंच वर्णन करणारा ठरला. निमित्त होतं आमदार प्रसाद लाड यांच्या मुलाच्या लग्नाच्या रिसिप्शन सोहळ्याचे.
भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या मुलाचा लग्नसोहळा काही दिवसांपूर्वी राजस्थानमध्ये संपन्न झाला. त्यानंतर, मुंबईत या लग्नसोहळ्यानिमित्ताने रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते. या रिसेप्शनसाठी राजकीय पक्षातील दिग्गज नेते, मंत्री आणि आमदारांचीही उपस्थिती दिसून आली. विशेष म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब आणि पक्षातील काही नेते व आमदारांसह भेट देत नव दाम्पत्यास आशीर्वाद दिले. यावेळी, रोहयोमंत्री भरत गोगावले आणि उद्धव ठाकरेंची ओझरती भेट झाली. नवरा-नवरीला शुभेच्छा देण्यासाठीच्या व्यासपीठावर उपस्थित गर्दीत अनेक नेते भेट घेऊन अभिनंदन करत होते, फोटोसेशन करत होते. त्यावेळी, भरत गोगावले हेही नवदाम्पत्यास बुके देऊन अभिनंदन करत असतानाच उद्धव ठाकरेंची एन्ट्री झाली. गोगावले पुढे आणि उद्धव ठाकरे पाठिमागे असल्याने भरत गोगावलेंनी उद्धव ठाकरेंना पुढे येण्याची विनंती केली. मात्र, ठाकरेंनी नको इथंच बराय असे म्हणत स्टेजवरील गर्दी कमी होण्याची वाट पाहिली. हा प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला आहे. आता, या प्रसंगावर भरत गोगावले यांनीही आपली प्रतिक्रिया दिली.
भरत गोगावलेंकडून भेटीचं स्पष्टीकरण
उद्धव ठाकरे माझ्या मागे उभे असल्याने त्यांना सोबत या असं मी म्हटलो, त्यावर नको, इथेच बरा आहे, असे ठाकरेंनी म्हटलं, अशी माहिती भरत गोगावलेंनी दिली. दोघांमधील या धावत्या आणि ओझरत्या भेटीची आणि घडल्या प्रसंगाची माहिती खुद्द भरत गोगावले यांनीच दिली. सध्या ठाकरे आणि शिंदेंच्या आमदाराच्या या भेटीची माध्यमांत चर्चा होत असून लग्नसोहळ्यातील ही भेट लक्षवेधी ठरली. दुसरीकडे विधानपरिषदेसाठी उद्धव ठाकरेंना पाठिंबा देणार का, असा प्रश्न एकनाथ शिंदेंना विचारण्यात आला होता. त्यावर, आधी निवडणुका जाहीर होऊ द्या, मग बघू, असे उत्तर शिंदेंनी दिले.
हेही वाचा
मोठी बातमी! एसटी महामंडळात 17,742 पदांची कंत्राटी भरती, परिवहन मंत्र्यांनी विधानसभेत दिली माहिती
आणखी वाचा
Comments are closed.