सोन्याचं आकर्षण महिलांना, मोदींच्या आवाहननंतर भरत गोगावलेंची मिश्कील प्रतिक्रिया, म्हणाले, मी..
रायगड : देशातील 5 राज्याच्या निवडणुकांच्या निकालानंतर काही दिवसांतच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra modi) आखाती देशातील युद्धाचा दाखला देत, महत्त्वाचं आवाहन केलंय. त्यामध्ये, नागरिकांनी देशासाठीच्या या लढाईत काही गोष्टी प्राधान्याने पाळायला हव्यात असे त्यांनी म्हटले. त्यासाठी, वर्षभर सोन्याचे दागिने (Gold) खरेदी करू नका, पेट्रोल-डिझेलची बचत होण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करा, असे आवाहन मोदींनी केले. त्यावरुन, आता राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यातच, सराफ व्यापाऱ्यांनीही मोदींच्या आवाहनावर आपल्या भावना व्यक्त करताना, सराफ व्यापार क्षेत्रातील कारागिर, कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होईल असे म्हटले. आता, मोदींच्या या आवाहनवर आपल्या अंगावर मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने घालून फिरणारे मंत्री भरत गोगावले (Bharat gogawale) यांनीही प्रतिक्रिया दिलीय.
देशवासीयांना सोनं खरेदीबाबत पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनानंतर मंत्री भरत गोगावले यांनी अनोखी प्रतिक्रिया दिली असून आता जवळ आहे, त्यात वाढ होणार नाही. मी घरच्याही मंडळींना सांगितलं आहे, आता वाढ झाली तर तुम्ही मला विचारा? असं भरत गोगावले यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना म्हटले. तसेच, माझ्याकडे जे आहे ते आहे, पण मी तसं गळ्यात तोडे, बिडे, हातात कोपरा-ढोपऱ्यापर्यंत तसं काही माझ्याकडे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले
सोन्याचं आकर्षण महिलांना असतं
घरातील मंडळींना सांगितल सद्या आता सोन्याची खरेदी करू नका, आता सोनं व्यापाऱ्यांची काही राहिलेली देणी आहेत ती पूर्ण करा. कारण, सोन्याचं महिलांना जास्त आकर्षक असतं, आम्हाला असायचं कारण नाही. माझ्याकडे हातात कडं, बोटात अंगठ्या आहेत, आता वाढ होणार नाही, इतरांसारख आम्हाला सोन दाखवायची सवय नाही, असे म्हणत भरत गोगावलेंनी गोल्ड मॅन आणि सोनं परिधान करुन व्हायरल होणाऱ्यांबद्दलचं उदाहरण देऊन सांगितलं. दरम्यान, पंतप्रधांनांनी अवाहन केलं तर अंगावरच सोनं सुद्धा घरी काढून ठेवण्याची तयारी माझी आहे, त्यात मोठं काही नाही. सोनं आहे म्हणून आमची ओळख नाही, पण अंगावरील नेपकीन आणि हातातील सोनं यामुळे भरतशेठ म्हणून ओळखलं जातं, असेही गोगावले यांनी स्पष्ट केले.
म्हसळा नगराध्यक्षांचा राजीनामा
रायगड जिल्ह्यातील म्हसळा नगरपंचायतीत मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. अवघ्या चार दिवसांपूर्वी नगराध्यक्षपदी निवडून आलेले शिंदे गटाच्या शिवसेनेचे शाहीद जंजीरकर यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला. जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याकडे त्यांनी हा राजीनामा सादर केला. आपण कोणत्याही दबावाखाली नसून स्वखुशीने राजीनामा दिला असल्याचं जंजीरकर यांनी स्पष्ट केलं. असं असलं तरी या घडामोडीमागे नेमकं काय कारण आहे, याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.