ऑपरेशन टायगरच्या हालचाली उद्धव ठाकरेंना थांगपत्ता लागण्याआधीच खासदारांशी बोलणी आटोपली, आता एकना

नवी दिल्ली/मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नुकत्याच झालेल्या दिल्ली दौऱ्याने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या उलथापालथीचे संकेत दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासोबत झालेल्या या भेटीनंतर ‘ऑपरेशन टायगर’ची (Shivsena Operation Tiger)चर्चा रंगली असून, उद्धव ठाकरे गटातील काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. ठाकरेंच्या खासदारांशी शिंदेंच्या नेत्यांनी अगोदरच संपर्क केल्याची माहिती विश्वसनीय नेत्यांनी दिली आहे. परंतु डी-डे (D-day) पूर्वी त्याविषयीची अनावश्यक चर्चा टाळण्याच्या सूचना देण्यात आल्याचीही सूत्रांची माहिती आहे.(Shivsena Operation Tiger)

दिल्लीत पक्ष संघटनेतील बदला संदर्भात चर्चा

राजधानी दिल्लीत एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.  त्यातच एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यानंतर मंत्री उदय सामंत, माजी खासदार राहुल शेवाळे राजधानी दिल्ली दौऱ्यावर आहेत. मंत्री उदय सामंत, माजी खासदार राहुल शेवाळे हे राजधानी दिल्लीत पक्ष संघटनेतील बदला संदर्भात चर्चा करण्यासाठी आले आहेत. अशी माहिती राहुल शेवाळे यांनी दिली आहे.(Shivsena Operation Tiger)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत केवळ राज्यातील विकासकामांवरच नाही, तर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय रणनीतीवरही सविस्तर चर्चा झाल्याचे समजते. लोकसभा खासदारांची संख्या वाढवण्यासाठी शिंदे गटाने विशेष नियोजन आखले असून, ठाकरे गटाला खिंडार पाडण्यासाठी योग्य मुहूर्ताची प्रतीक्षा असल्याचे बोलले जात आहे. या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असून, आपल्या खासदारांना रोखण्यासाठी काय हालचाली होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(Shivsena Operation Tiger)

उदय सामंत आणि राहुल शेवाळे दिल्लीत दाखल

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर लागलीच मंत्री उदय सामंत आणि माजी खासदार राहुल शेवाळे हेदेखील दिल्लीत दाखल झाले आहेत. पक्ष संघटनेतील बदला संदर्भात आणि संघटनात्मक बांधणीसाठी आपण दिल्लीत आल्याची माहिती राहुल शेवाळे यांनी दिली आहे. यावेळी शेवाळे नाराज असल्याच्या चर्चांचाही त्यांनी इन्कार केला आहे.

काय आहे उदय सामंत यांची प्रतिक्रिया?

‘ऑपरेशन टायगर’ आणि ठाकरे गटाचे खासदार संपर्कात असल्याच्या चर्चांवर मंत्री उदय सामंत यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, एकनाथ शिंदे हे शिवसेना खासदार यांना भेटण्यासाठी गेले होते, नरेंद्र मोदी यांची त्यांनी भेट घेतली. तुम्ही जे ऑपरेशन म्हणताय ते माझ्या ऐकीवात नाही. मला याची माहिती नाही. मी माझ्या विभागातील कामाबद्दल सुद्धा दिल्लीत भेटीगाठी घेतल्या. मी दिल्लीमध्ये गेलो संघटनात्मक चर्चा केली. राहुल शेवाळे कुठेही नाराज नाहीत. ते राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. ते जोमाने काम करतील. त्यामुळे कुठेही तुम्ही राहुल शेवाळे नाराज आहे असा संभ्रम पसरवू नका. एकनाथ शिंदे यांची भेट खासदार आणि नरेंद्र मोदी यांच्यासोबत झाली. ऑपरेशन टायगर एकनाथ शिंदे करणार नाहीत, त्यांचा उपमुख्यमंत्री म्हणून आणि नेते म्हणून कर्तृत्व पाहून स्वतः नेते खासदार आमच्यासोबत येतात. ठाकरे शिवसेना खासदार आमच्या संपर्कात नाही. पण काँग्रेसचे खासदार आमच्या संपर्कात आहेत, असंही पुढे उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा

Comments are closed.