ओम इशनेश्वरराय नमः जप 11 वेळा करायला सांगायचे, महादेवाच्या पिंडीवरचा हंडा हलायाचा अन् प्रश्न वि
मुंबई: “नाशिक येथील बहुचर्चित बलात्कार प्रकरणात स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या अटकेनंतर आता तपासाला वेग आला आहे. गुन्हे शाखेला तपासादरम्यान काही आक्षेपार्ह व्हिडिओ आणि तांत्रिक पुरावे हस्तगत करण्यात यश आले आहे. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून स्थापन करण्यात आलेले SIT पथक आता खरातच्या आर्थिक व्यवहारांची आणि राजकीय संबंधांची चौकशी करत असून, यातून मोठे खुलासे होण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत, अशातच या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी संताप व्यक्त करत रुपाली चाकणकरांवरती (rupali chakankar) तोफ डागली आहे.
अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं की, महाराष्ट्रामध्ये एक नाव खूप चर्चेत आहेत, कॅप्टन खरात..त्याला भोंदू बाबा नाव दिलं आहे… माध्यमांना विनंती आहे की त्याला विकृत बाबा नाव द्या. शेकडो महिलांचे त्याने लैंगिक शोषण केले आहे. महाराष्ट्रचा एपस्टीन फाईल याला म्हणता येईल. सुषमा अंधारे यांची आत्ताच पत्रकार परिषद झाली. अनेक राजकीय पक्षाचे नेते त्यांना भेटले आहेत. श्रावणातले ४ सोमवार आणि महाशिवरात्री या दिवशी, ओशनो प्रे करायला लावायचे. ओम इशनेश्वरराय नमः हे जप11 वेळा करायला सांगायचे, यावेळी महादेवच्या पिंडीवरचा हंडा हलायाचा आणि प्रश्न विचारायाला लावायचे. सिद्ध प्रेय यामध्ये होम हवन केले जायचे. त्यात अनेकांना वेगवेगळ्या आकृत्या दिसायच्या, आवाज यायचे, यामुळे लोक हिप्नोसिस व्हायचे यामध्ये अनेकांचे लैंगिक शोषण झालं. खूप गोष्टी आहे जे मी सगळं लिहून घेतल्या आहेत.मुंबईत कार्यरत असलेले डीप्युटी कलेक्टर खरात यांना पैसे पुरवतात, अगदी वकील सुद्धा देतात, VSR सोबत खरात यांचे सुद्धा फोटो आहे, सावकारी करून जमिनी खरात हडप करायचा असंही दमानिया यांनी म्हटलं आहे.
पुढे दमानिया म्हणाल्या की, साई सिल्वर नावाचे मंगल कार्यालय शिर्डी येथे आहे. त्याने खरातचे पैसे दिले नाही म्हणून मंगल कार्यालय त्याने हडप केले. विकास दिवटे नावाचा प्रकरण झालं होतं ते दाबण्यात आलं, आता ही फाईल ओपन करावी. त्यांच्या घरी १३ किलो सोनं आहे. गावाची यादी आहे. ज्यामध्ये जमिनी खरातच्या नावावर आहेत. सिन्नर, नाशिक पाथर्डी, शिर्डी येथे त्यांच्या जमिनी आहेत. मी सदानंद दाते यांना सगळे कागदपत्रे देणार आहे. आत्ता आषाढी एकादशी झाली, ज्यांना पांडुरंग दर्शन झालं नाही, त्यांनी खरातचं दर्शन घ्यावं असा रुपाली चाकणकर म्हणतात. रुपाली चाकणकर तुम्ही थर्ड क्लास आहात, येत्या २४ तासाच्या आत मुख्यमंत्री यांनी राजीनामा घेतला नाही तर मी आवाहन करेल राज्यातील संपूर्ण महिलांना तारीख आणि वेळ ठरवून महिल्या नेत्यांना सुद्धा सांगेल या विरोधात ठिय्या आंदोलन करू, हे मी जाहीर करते, असं म्हणत दमानियांनी संताप व्यक्त केला आहे.
काही राजकारणी सल्ला घायला घ्यायला जायचे. तर काही नेते ओशनो जल घ्यायचे. तिरुपती बालाजीचे ट्रस्टी तर हे ओशनो जल घ्यायला हेलिकॉप्टरने घ्यायला यायचे. अनेक टॉपचे लीडर त्यात आहेत जे भेटी गाठी घ्यायचे. रुपाली चाकणकर यांना का वाचवलं जाताय? एवढं प्रकरण आहे तरी सुद्धा तुम्ही त्यांना वाचवताय, आज जर मुख्यमंत्री, गृहमंत्री यावर काही बोलले नाही, तर मी मुख्यमंत्री गृहमंत्री यांना म्हणणार नाही, रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घ्या बडतर्फ करा, फरार असतील तर त्यांना पातळातून जाऊन शोधून काढा चौकशी त्यांची करा अटक त्यांना करा. हे खुलासे मी करत राहील. आज, उद्या, सोमवारी मी हे मी खुलासे करत राहील, असंही त्या म्हणाल्यात.
आणखी वाचा
Comments are closed.