मुंबईतला तो डेप्युटी कलेक्टर कोण? जो भोंदूबाबा कॅप्टन अशोर खरातला पैसा पुरवायचा, तपासात अनेक कन

नाशिक: नाशिकच्या ‘कॅप्टन’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात (Ashok Kharat) या स्वयंघोषित भविष्यवेत्त्याच्या काळ्या कृत्यांनी सध्या संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर खरातसोबतचे अनेक दिग्गज चेहरे आणि बड्या नेत्यांचे फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, त्याचे उच्चभ्रू वर्तुळातील संबंध आता चव्हाट्यावर आले आहेत. केवळ राजकीय नेतेच नव्हे, तर प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी देखील स्वतःचे भविष्य जाणून घेण्यासाठी खरातच्या दरबारात हजेरी लावत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (anjali damania) यांनी केलेल्या एका आरोपामुळे मोठी खळबळ उडाली आहे. मुंबईत कार्यरत असलेले एक उपजिल्हाधिकारी खरातला आर्थिक रसद पुरवत असल्याचे दमानिया यांनी म्हटले असून, यामुळे या प्रकरणाचे धागेदोरे थेट प्रशासकीय यंत्रणेपर्यंत पोहोचले आहेत. इतरांच्या भविष्याची कुंडली मांडणाऱ्या या भोंदूची स्वतःची काळी कुंडली आता नाशिक पोलिसांच्या हाती लागली आहे. या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी राज्य सरकारने तातडीने ‘एसआयटी’ची स्थापना केली असून, आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत.(Ashok Kharat)

गुरुवारी एसआयटी पथकाने खरातची सुमारे दोन तास कसून चौकशी केली. या चौकशीदरम्यान त्याच्याकडे असलेल्या संशयास्पद पॅनड्राईव्हबाबतही अधिकाऱ्यांनी माहिती घेतल्याचे समजते. खरातभोवती नेहमीच राजकीय नेत्यांचा आणि वजनदार व्यक्तींचा गराडा असायचा, मात्र आता त्याच्या विकृत कृत्यांचा भांडाफोड झाल्याने त्याचे हे ‘कॅप्टन’ पद आणि वलय पूर्णपणे मोडीत निघाले आहे. मुंबईतील त्या विशिष्ट उपजिल्हाधिकाऱ्याचा खरातला असलेला पाठिंबा आणि मदत आता तपासाचा मुख्य केंद्रबिंदू ठरत असून, यातून अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काल (शुक्रवारी, ता २०) पत्रकार परिषद घेत याबाबत आपला संताप व्यक्त केला. मुंबईतील एक डेप्युटी कलेक्टर (उपजिल्हाधिकारी) खरातला सतत मदत करत आहेत. ते खरातला पैसे आणि वकील पुरवत असून त्यांचे आर्थिक संबंध असल्याचा आरोप दमानिया यांनी केला आहे. मुंबईतील त्या उपजिल्हाधिकाऱ्यांचे खरात याच्याशी आर्थिक हितसंबंध होते. खरात याला पैसा आणि वकील पुरविण्याचे काम संबंधित उपजिल्हाधिकारी करत आहे, असे अधिकाऱ्याचे नाव न घेता अंजली दमानिया यांनी सांगितले.

महिलांवर अत्याचार कसा करायचा?

मी कृष्णाचा अवतार आहे. तू मागच्या जन्मातील माझी राधा आहे, असे सांगून महिलेच्या डोक्यावर तांब्या-लोटा ठेऊन कॅप्टन खरात त्यांच्या कानाजवळ पुटपुटायचा. त्यापूर्वी पेढा आणि कडवट – खारट चव असलेले पाणी प्यायला द्यायचा. महिलांना गायत्री मंत्री म्हणायला लावायचा आणि लागलीच त्यांना अंगाला स्पर्श करायला सुरुवात करायचा. महत्त्वाचे म्हणजे महिलेसोबत आलेल्या व्यक्तींना ध्यानस्थ पूजेच्या नावाखाली त्याच्या दालनाबाहेर बसवून ठेवायचा.महिलांना गुंगी आली की त्यांचे लैंगिक शोषण करीत असे. कॅप्टन अशोक खरातच्या लैंगिक शोषणाचा हा पॅटर्न होता. कधीकधी संमतीने तर कधी जबरदस्तीने तो महिलांवर अत्याचार करीत असे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून त्याची काळी कृत्ये सुरू असल्याची माहिती आहे.

प्रसाद म्हणून भुकटी केलेली वायग्रा खायला द्यायचा

अशोक खरात आपल्या मंदिरात येणाऱ्या महिलांना प्रसाद म्हणून विशेष जल द्यायचा. ज्याला तो ‘ओश्नो जल’ म्हणायचा. हे जल म्हणजे प्रत्यक्षात कफ सिरप, पाणी आणि भुकटी केलेली वायग्रा (Viagra) गोळ्यांचे मिश्रण असायचे. हे ओश्नो जल मिळवण्यासाठी अनेक वेळा रांगा लागायच्या.

आणखी वाचा

Comments are closed.