महिलांचं योनी शुद्धीकरण, देव असल्याचा आव, दत्तात्रय खेमनारांनी अशोक खरातच्या काळ्या कृत्याची कु

अशोक खरात गुन्हा: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याने 200 पेक्षा जास्त महिलांचे लैंगिक शोषण केले असावे, असा अंदाज ‘खबरदार मराठी ’ दैनिकाचे संपादक दत्तात्रय खेमनार यांनी व्यक्त केला. अशोक खरात (Ashok Kharat) याने शारीरिक अत्याचार (Sexual Assault) केलेल्यांपैकी बहुतांशी महिला या उच्चशिक्षित आणि राजकारणी घराण्यातील असल्याचा दावाही खेमनार यांनी केले. ‘मुंबई तक’ला दिलेल्या मुलाखतीत दत्तात्रय खेमनार यांनी अशोक खरातच्या अनेक काळ्या कृत्यांचा पाढा वाचला. (Nashik Crime news)

कॅप्टन खरात हा महिलांना संमोहित करुन किंवा त्यांना गुंगीचे औषध देऊन त्यांच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित करायचा, अशी चर्चा आहे. मात्र, दत्तात्रय खेमनार यांनी या प्रकरणात एक धक्कादायक उलगडा केला. अशोक खरात याच्याकडे येणाऱ्या अनेक महिला उच्चशिक्षित, सरकारी अधिकारी आणि राजकीय घराण्यातील होत्या. अशोक खरात या महिलांना म्हणायचा की, ‘मी देव आहे. तुझं आयुष्य चांगलं करायचं असेल तर मला तुझं योनी शुद्धीकरण करावं लागेल. त्यासाठी तो महिलेला स्वत:चं मुत्र प्यायला लावायचा’, असा खळबळजनक दावा दत्तात्रय खेमनार यांनी केला.

एका व्यावसायिकाला धंद्यात तोटा झाल्यानंतर तो मार्गदर्शनसाठी अशोक खरात याच्याकडे आला होता. त्याला खरातने खोटी रत्नं देऊन फसवले. त्याला आधी साडेतीन लाख रुपयांना एक रत्न विकले. दुसरे रत्न दोन लाखांना विकले. पण ही दोन्ही रत्नं खोटी निघाल्याचे नंतर या व्यावसायिकाच्या लक्षात आले. याशिवाय, अशोक खरात हा त्याच्याकडे येणाऱ्या स्त्री-पुरुषांनाही एकमेकांशी लैंगिक संबंध ठेवायला सांगायचा. खरातने एका बड्या उद्योजकाचे दुसऱ्या एका महिलेशी संबंध जुळवून दिले. नंतर ती महिला ‘प्रेग्नंट’ (गर्भवती) असल्याचे खोटे सांगून त्या उद्योजकाला ब्लॅकमेल करत खरातने त्याच्याकडून 20 कोटी रुपये उकळले, असेही खेमनार यांनी सांगितले.

Maharashtra minister and Ashok Kharat: अशोक खरात एका मंत्र्याला शक्तीवर्धक गोळ्यांचं पाणी द्यायचा: खेमनार

अशोक खरात हा महाराष्ट्रातील एका माजी मंत्र्याला शक्तीवर्धक गोळ्यांचं पाणी द्यायचा. ते पाणी बाटलीत भरुन देत असे. ते पाणी म्हणजे ओशनो जल आहे. हे पाणी प्यायल्यास तू एनर्जिटीक राहशील, तब्येत चांगली राहील. भविष्यात तुला खूप ताकद येईल, असे सांगून अशोक खरातने या मंत्र्याला गंडवले, अशी माहितीही दत्तात्रय खेमनार यांनी दिली.

आणखी वाचा

आधी म्हणाल्या ते माझे गुरु होते, मग अशोक खरातचा डायरेक्ट एकेरी उल्लेख, राजीनामा देताच रुपाली चाकणकर पत्रकारपरिषदेत नेमकं काय म्हणाल्या?

आणखी वाचा

Comments are closed.