पाणी कुठपर्यंत मुरलंय ते कळू द्या; भोंदूबाबा अशोक खरातप्रकरणावर उद्धव ठाकरेंचं परखड भाष्य

मुंबई : राजधानी मुंबई (मुंबई) एक्सपोर्ट इम्पोर्ट लॉजिस्टिक कोर्सचा शुभारंभ माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याहस्ते करण्यात आला. या कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी लॉजिस्टिक कोर्स सुरू करण्याच्या उद्देशासह राज्यातील राजकीय परिस्थिती, भोंदूबाब प्रकरणासह विविध विषयावर भाष्य केलं. राज्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या भोंदूबाबा अशोक खरातसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावरही उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं. ओम फट स्वाहा.. म्हणत राज्यातील भोंदूबाबानवार (अशोक खरात) कारवाई झाली पाहिजे, असे आवाहन त्यांनी मुख्यमंत्र्‍यांना केले.

भोंदूबाबा अशोक खरात संदर्भातील प्रश्नावर उत्तर ठाकरेंनी आपली भूमिका मांडली. अजून किती खालच्या पातळीवर आपण उतरणार आहोत. जादूटोणा विरोधी कायदा आपल्याकडे आहे, पण कायद्याचे पालकन करणारेच त्यांच्या नादी लागणार असतील, तर त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे. आम्ही महाराष्ट्रला पुढे नेणार आहोत, हा विषय घेऊन पुढे जातोय. पण, टाचण्या, लिंबाचा विषय समोर आलाय हे योग्य नाही. एपस्टीन फाईलमधून कोणाचं लक्ष उडू नये यासाठी सगळ्या गोष्टी सुरू आहेत. अनेक फोटो आणि नावं समोर येत आहेत, ज्यांचं कर्तृत्व नाही त्यांना असे मार्ग घ्यावे लागतात, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.

महाविकास आघाडी सरकारने पाणी देऊन मदत केली

महाविकास आघाडीच्या सरकारमध्येही या भोंदूबाबाला मदत झाली यासंदर्भातही उद्वव ठाकरेंनी भाष्य केलं. माझं काहीही म्हणणं नाही, तुम्ही सगळ्यांची चौकशी करा. कारण, पाणी कुठपर्यंत मुरलंय ते कळू द्या, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात भोंदू बाबाला पाणी देण्यासाठी केलेल्या मदतीवरूनही स्पष्टीकरण दिले. तसेच, यानिमित्ताने गावोगावी असलेल्या भोंदूबाबांवर कारवाई झाली पाहिजे, त्यांच्याकडे कुठल्याही पक्षाचा झेंडा असला तरी कारवाई झाली पाहिजे, अगदी ओम फट स्वाहा.. असे म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्‍यांना आवाहन केले आहे.

सातारा मारहाण (Satara ZP election)

विधिमंडळ अधिवेशनात विरोधकांनी आता पुरव्यानिशी अनेक भ्रष्टाचार बाहेर काढले आहेत. जे जे ढोंगी आहेत त्यांचे एक पांघरुन घातलं जातंय, आता मुख्यमंत्र्यांनी हे पांघरुन बाहेर काढलं पाहिजे, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटलं. दरम्यान, सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेल्या मारहाणीवरूनही त्यांनी भाष्य केलं. आता, त्यांच्या लक्षात येईल की, रेड्याप्रमाणे लोकशाही देखील कापली जाते, असे उत्तर ठाकरेंनी दिले.

लॉजिस्टिक कोर्स सुरू करण्याचा उद्देश

23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरु झालं असून तेव्हाच मी जाहीर केलं होत की, मराठी लोकांसाठी आम्ही एक पाऊल पुढे आणत आहोत. स्थानिक भूमीपुत्रांना दारं बंद होती, त्यामुळे आम्ही नुसती आंदोलन नाही केलं तर प्रशिक्षण वर्गदेखील सुरु केली. सध्या कंपन्यांत कुशल मराठी आणि मुलं लागतात, त्यांना पात्र बनवण्यासाठी आम्ही प्रशिक्षण सुरु केलं आहे. आजकाल लॉजिस्टिक मोठ्या प्रमाणावर आहे. नवी मुंबई एअरपोर्ट आहे, तिथल्या भूमी पुत्रांना संधी असेल तर त्यांना ती मिळाली पाहिजे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी लॉजिस्टिक कोर्सच्या शुभारंभाचा उद्देश सांगितला.

हेही वाचा

महिलांचं योनी शुद्धीकरण, देव असल्याचा आव, दत्तात्रय खेमनारांनी अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांची कुंडली बाहेर काढली

आणखी वाचा

Comments are closed.