एकनाथ शिंदेंना गुवाहाटीचा मार्ग अशोक खरातनेच दाखवला, ठाकरेंच्या नेत्याचा खळबळजनक दावा
Vinayak Raut on मराठी : नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरुन चांगलच राजकीय वातावरण तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. अशातच एकनाथ शिंदे (मराठी) यांना गुवाहाटीचा मार्ग अशोक खरात यानेच दाखवला होता असा खळबळजनक दावा शिवसेना ठाकरे गटाचे सचिव आणि माजी खासदार विनायक राऊत (विनायक राऊत) यांनी केलाय.
माजी मंत्री दीपक केसरकर यांची SIT चौकशी व्हायला पाहिजे
माजी मंत्री दीपक केसरकर यांची SIT चौकशी व्हायला पाहिजे. तसेच खरात यांच्याकडे जाणारी वाट दीपक केसरकर यांनी एकनाथ शिंदे यांना दाखवली आणि खरात याने शिंदेना गुवाहाटीची वाट दाखवल्याचे राऊत म्हणाले. खरात जेव्हा तोंड उघडेल तेव्हा मंत्री मंडळातले अर्धे मंत्री उघडे पडतील असे विनायक राऊत म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील भ्रष्टाचारी आणि कलंकित नेत्यांची चौकशी करून त्याना काढून टाकावे असेही राऊत म्हणाले. कोणत्याही दबावाला बळी न पडता खरात याची चौकशी सुरु ठेवावी असे राऊत म्हणाले.
अशोक खरातचा घात करण्याची शक्यता नाकारता येत नाही
अजून दोन दिवस अधिवेशन आहे. त्यामुळं यावर सखोल चौकशी व्हावी असे राऊत म्हणाले. पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायदा बनवणाऱ्या महाराष्ट्रातले संविधानात्मक पदावरच्या नेता त्यांचे पाय धूत होता ही शरमेची बाब असल्याचे राऊत म्हणाले. खरात याच्या व्हिडीओची पूर्ण चौकशी होईपर्यंत त्यांचा घात करण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण त्यात ज्या ज्या नेत्यांची नावे येतील त्यांच्याकडून खरात यांचा घात हाऊ शकतो. त्यांच्या जीवाचे रक्षण करणे हे गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कर्तव्य असल्याचे राऊत म्हणाले. खरात प्रकरणात आमच्या पक्षातील नेत्याचे नावे आली आहेत तरीही त्याची हकालपट्टी व्हावी. या प्रकरणातील कोणताही नेता असो, राज्यातील जनतेने त्याला उभ करु नये त्यांना बहिष्कृत करावे असे राऊत म्हणाले.
आणखी वाचा
Comments are closed.