पक्षाची बदनामी रोखण्यासाठी चाकणकरांचा राजीनामा घ्या; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदार, नेत्य

मुंबई: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचं (Ashok Kharat) प्रकरण सध्या देशासह राज्यभरत चांगलचं गाजत आहे. नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरुन सध्या राजकीय वर्तुळात अनेकांचे धाबे दणाणले आहेत. अशोक खरात (Ashok Kharat) हा राज्यातील अनेक बड्या राजकीय नेत्यांचा अध्यात्मिक मार्गदर्शक होता. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना अशोक खरात याच्याशी जवळचे संबंध असल्यामुळे राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर आता रुपाली चाकणकर यांना आणखी एक झटका बसण्याची शक्यता आहे.

रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असला तरी त्यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) महिला प्रदेशाध्यक्षपद आहे. मात्र, आता या पदावरुनही रुपाली चाकणकर यांची उचलबांगडी होण्याची दाट शक्यता आहे. (Maharashtra Politics) अशातच एक महत्वाची माहिती समोर आली आहे. पक्षाच्या मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत निम्म्याहून जास्त आमदारांसह नेत्यांकडून पक्षाची बदनामी रोखायची असेल तर चाकणकर यांचा राजीनामा घेणेच योग्य राहील, अशी अजित पवार गटाच्या आमदारांनी भूमिका घेतल्याची माहिती समोर आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत निम्म्याहून जास्त आमदारांसह नेत्यांकडून पक्षाची बदनामी रोखायची असेल तर रूपाली चाकणकर यांचा राजीनामा घेणेच योग्य राहील अशी भूमिका व्यक्त केल्याची माहिती आहे. आमदारांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्यासमोर ही भूमिका मांडल्याचं समोर आलं आहे. रुपाली चाकणकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) महिला प्रदेशाध्यक्षपद पदाचा राजीनाम्याचा निर्णय आता राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्यात कोर्टात आहे.

खरातसोबतचे फोटो, पाय धुतलेले व्हिडीओ व्हायरल

अशोक खरातचे महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर ते अनेक बड्या राजकीय नेत्यांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्याने मोठ्या प्रमाणावर आरोप प्रत्यारोप झाले. याच आरोपांच्या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नावे पत्र लिहित राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांनी हे पत्र राष्ट्रवादीच्या अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे दिले. या प्रकरणामुळे केवळ नाशिकच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. त्याआधी रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेऊन त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती.

राजीनाम्याच्या पत्रात चाकणकरांनी काय म्हटलं?

रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या म्हटलं आहे की, “मी रुपाली निलेश चाकणकर विनंतीपूर्वक कळवू इच्छिते की, १५ ऑक्टोबर २०२४ रोजी माझी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची अध्यक्षा म्हणून नियुक्ती झाली होती. माझ्या वैयक्तिक कारणाने मी स्वेच्छेने सदर पदाचा राजीनामा या पत्राद्वारे सादर करत आहे.”

“आजवर माझ्यावर विश्वास दाखवून आपण मला सर्वतोपरी सहकार्य केले त्याबद्दल मी आपली व सर्व सहकाऱ्यांची शतशः ऋणी आहे. भविष्यातही मला आपले असेच सहकार्य राहील असा मला विश्वास आहे. तरी आपण माझा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा स्वीकार करावा अशी आपणांस नम्र विनंती आहे,” असं रुपाली चाकणकर यांनी पत्रात म्हटलं आहे.

आणखी वाचा

Comments are closed.