पेट्रोलचा मुबलक साठा, सोशल मीडियात अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार; मंत्री महाजनांचा इशारा

मुंबई : राज्यात गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर एजन्सीबाहेर रांगाच रांगा लागल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र, घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा नसून ग्राहकांना नियमितपणे मिळेल, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले. आता, पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा असल्याचं पाहायला मिळत आहे. पेट्रोल पंपावर नागरिकांच्या रांगा लागल्या असून आपल्या वाहनात पेट्रोल टाकण्यासाठी गर्दी झाल्याचं दिसून येतं. त्यामुळे, अनेक ठिकाणी पेट्रोल पंपचालकांनी जास्तीत जास्त 200 किंवा 300 रुपयांचेच पेट्रोल देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, पेटोल-डिझेलसंदर्भात अफवा पसरवल्यास गुन्हे दाखल केले जातील, असा इशाराच मंत्री गिरीश महाजन यांनी दिला आहे.

इंधन पुरवठ्यासंदर्भात जगभरात अशीच परिस्थिती आहे, पण आपण संयम बाळगावा. कमर्शियल गॅस बाबतीत शोर्टेज आहे, घरगुती बाबतीत नाही. 350 के1 रॉकेल आलं असून त्याचा वापर करुन आपली गरज भागवू शकतो, असे मंत्री गरीश महाजन यांनी म्हटलं. तसेच, सोशल मीडियावर पेट्रोल-डिझेल तुटवड्यासंदर्भात जे अफवा पसरवीत आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार असा इशारा देखील गिरीश महाजन यांनी दिला आहे. गिरीश महाजन यांनी विविध विषयांवर पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरे दिली.

पेट्रोलचा मुबलक साठा

नाशिकमध्ये पेट्रोलसाठी रांगा लागत आहेत, यासंदर्भातही गिरीश महाजन यांनी भाष्य केलं. मागील महिन्यापेक्षा दीड पट मागणी गेल्या चार महिन्यात वाढली आहे. कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे, पेट्रोल पंप चालकांकडे संपूर्ण पेट्रोल-डिझेलचा साठा आहे. मात्र, मागणी अधिक वाढल्याने तुटवडा जाणवत आहे. अतिरिक्त साठा करण्याची गरज नाही, सोशल मीडियावर अफवा पसरत आहेत. त्यामुळे, रांगा लागत आहेत, सिलेंडरसाठी देखील रांगा लावण्याची गरज नाही. नागरिकांना घरपोच सिलेंडर मिळत आहेत, कुठेही गर्दी करू नका, त्यामुळे सेवा विस्कळीत होत आहे, कुठेही तुटवडा नाही, असेह

अशोक खरात प्रकरण अतिशय गंभीर असून ही विकृती आहे, आपल्या समाजात काही लोक या गोष्टी माननारे आहेत, ते विश्वास ठेवतात. मला दोन महिन्यांपूर्वी याबाबत कल्पना होती, पोलिसांना तशी सूचना दिली होती. आता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्यानुसार गंभीर दखल घेतली जाईल. अशोक खरात कायमस्वरूपी जेलमध्ये कसा राहील हे पाहिले जाईल. खरातची हजारो कोटींची प्रॉपर्टी आहे, त्याच्या प्रॉपर्टीज कशा जोडल्या जातील याबाबत देखील कारवाई होईल, असे महाजन यांनी सांगितले.

हेही वाचा

LPG Crisis Update : देशातील पेट्रोल-डिझेल, LPG साठा किती दिवस पुरणार? सरकारकडून मोठी माहिती समोर

आणखी वाचा

Comments are closed.