काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात, कारला ट्रकची धडक, थोडक्यात बचावले

प्रशांत पडोळे नागपूर अपघात: काँग्रेस पक्षाचे भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या गाडीचा सोमवारी पहाटे भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीत सुरु असलेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी प्रशांत पडोळे (MP Prashant Padole) दिल्लीला निघाले असताना हा अपघात झाला. दिल्लीला जाण्यासाठी नागपूर एअरपोर्टकडे निघालेल्या भंडारागोंदियाचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्या वाहनाला एका ट्रकने जबर धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, प्रशांत पडोळे यांच्या कारच्या पुढील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. परंतु, सुदैवाने प्रशांत पडोळे या अपघातामधून थोडक्याच बचावले आहेत. (Maharashtra Politics news)

प्राथमिक माहितीनुसार, दिल्लीला जाण्यासाठी खासदार प्रशांत पडोळे हे सुरक्षारक्षक आणि चालकासह पहाटे नागपूर एअरपोर्टकडे निघाले होते. त्यावेळी  नागपूर जिल्ह्यातील हल्दीरामसमोर ट्रकने त्यांच्या वाहनाला जबर धडक दिली. नशीब बलवत्तर या अपघातातून खासदार प्रशांत पडोळे थोडक्यात बचावले. मात्र, ते या अपघातात किरकोळ जखमी झाले.  किरकोळ जखमी झाल्यानंतर खासदार प्रशांत पडोळे यांनी एका दुचाकीस्वराला लिफ्ट मागून नागपूर गाठलं आणि तिथं प्राथमिक उपचार घेतल्यानंतर नागपूर एअरपोर्टवर पोहोचून ते दिल्लीकडे रवाना झाले. यापूर्वीही खासदार प्रशांत पडोळे यांच्या वाहनाचा नागपूर इथं काही महिन्यांपूर्वी भीषण अपघात झाला होता. त्यातही ते किरकोळ जखमी झाले होते. खासदारांच्या वाहनाचा हात दुसरा अपघात आहे. हा अपघात नेमका कसा झाला, याचा तपशील अद्याप कळू शकलेला नाही.

Ratnagiri Accident: रत्नागिरीच्या भोस्त घाटात केमिकलचा टँकर पलटी

रत्नागिरीच्या भोस्ते घाटात वादग्रस्त लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनी मधून इथाइल ऍसिटेट केमिकल घेऊन जाणारा टँकर पलटी झाल्याची घटना रविवारी संध्याकाळी घडली. PFAS वरून वाद सुरू असलेल्या या कंपनीचा टँकर पलटी झाल्याने परिसरात खळबळ उडाली. संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. या टँकरमध्ये ज्वलनशील केमिकल होते. त्यामुळे या अपघातानंतर या परिसरात काहीसे भीतीचे वातावरण होते. या टँकरमधील केमिकल परदेशात निर्यात करायचे होते. त्यासाठी हा केमिकल टँकर मुंबईच्या दिशेने येत असताना अपघात घडला. या अपघातानंतर अग्निशमन दलाच्या गाडीसह, पोलिस आणि लक्ष्मी ऑरगॅनिकमधील सेफ्टी टीम घटनास्थळी दाखल झाली. अपघातग्रस्त टँकरमधील रसायन दुसऱ्या टँकरमध्ये शिफ्ट करण्यात कंपनी प्रशासनाला यश आले आहे. पहाटे रसायन दुसऱ्या टँकरमध्ये काढून भोस्ते घाटातील अपघातग्रस्त टँकर पोलीस प्रशासनाच्या मदतीने बाजूला हटवण्यात आला.

आणखी वाचा

अपघाताचा महामार्ग! नागपूर जिल्ह्यातील काटोल- वरुड सिमेंट महामार्गाला मोठ्या भेगा, 10 दिवसात दोन दुकाचीस्वरांचा अंत, एक वर्षात 30 अपघातांची नोंद

आणखी वाचा

Comments are closed.