मेट्रो वूमन, देवेंद्र फडणवीसांच्या विश्वासू; आता मुंबई महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त होणार
BMC नवीन आयुक्त अश्विनी भिडे राज्याचं लक्ष लागून असलेल्या मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदासाठी (BMC Commissioner) नाव निश्चित झाल्याचं समोर आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मर्जीतल्या आणि मेट्रो वूमन अशी ओळख असलेल्या अश्विनी भिडे (Ashwini Bhide) यांचं नाव मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदसाठी निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अश्विनी भिडे या सध्या मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत असून आज त्यांच्या नावाची घोषणा होणार असल्याची माहिती आहे.
मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी हे 31 मार्च रोजी निवृत्त होणार आहेत. त्यांच्या ठिकाणी आता अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती आहे. अश्विनी भिडे या 1995 बॅचच्या आयएएस अधिकारी असून या आधी त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सोमवारी संध्याकाळी एक बैठक संपन्न झाली होती. या बैठकीत दोन नावं होती चर्चेत, ज्यात असिम गुप्ता आणि अश्विनी भिडेंची चर्चा होती. मात्र शेवटी अश्विनी भिडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कोण आहेत अश्विनी भिडे?, पाहा आतापर्यंतची प्रशासकीय कारकीर्द- (Who Is Ashwini Bhide)
- मुंबई महापालिकेच्या आयुक्त म्हणून अश्विनी भिडे यांचे नाव जवळपास निश्चित झाल्यानंतर अश्विनी भिडे या मुंबई महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त असतील.
- अश्विनी भिडे 1995 च्या महाराष्ट्र कॅडरच्या IAS अधिकारी आहेत.
- अश्विनी भिडे यांनी त्यांची प्रशासकीय कारकीर्द कोल्हापुरातून सरू केली. 1997 ते 1999 या काळात त्या सहाय्यक जिल्हाधिकारी पदावर कार्यरत होत्या.
- त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची बदली करण्यात आली.
- नागपूरमध्येही त्यांनी जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केलंय.
- 27 वर्षांच्या प्रशासकीय सेवेत अश्विनी भिडे यांनी अतिरिक्त विभागीय आयुक्त, राज्यपालांच्या संयुक्त सचिव, मुंबई महानगर विकास प्रधिकरणात अतिरिक्त आयुक्त आणि शालेय शिक्षण-क्रिडा विभागाच्या सचिव म्हणूनही काम केलं आहे.
- 2015 मध्ये मुंबई मेट्रो-3 ची धुरा अश्विनी भिडे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आणि त्यांना मेट्रो वुमन म्हणून एक ओळख मिळाली.
- मुंबईच्या ॲक्वा लाईनच्या (मेट्रो लाईन 3) विकासात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
- डिसेंबर 2024 पासून अश्विनी भिडे या मुख्यमंत्री कार्यालय प्रधान सचिव म्हणून कार्यरत आहेत.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.