संतापनजक! महिलेकडे शरीरसुखाची मागणी, आरोपी पोलीस अधिकाऱ्याचा थाट; प्यायला बिस्लेरी, मोबाइलही

अकोला : शहरातील सिव्हिल लाईन पोलीस (Police) स्टेशनमधील धक्कादायक प्रकाराने महाराष्ट्र पोलीस दलाची मान शरमेनं खाली गेली आहे. एकीकडे अशोक खरातप्रकरणावरुन पोलिसांचा वेगाने तपास सुरू असून महिला लैंगिक अत्याचार प्रकरणातील घटनांवर कडक कारवाई केली जात आहे. मात्र, दुसरीकडे सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीद घेऊन सेवा करणाऱ्या पोलीस दलातील एका अधिकाऱ्यानेच महिलेकडे (Women) शरीरसुखाची मागणी केलीय. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी (Akola) दाखल झाले होते. याप्रकरणी, आरोपी अटकेत असून न्यायालयाने त्यास 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र, अटकेतील या आरोपीला प्यायला मिनरल वॉटर अन् मोबाइलही वापरायला सहज मिळत असल्याने पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त होत आहे.

पोलीस कोठडीत असलेल्या एका महिला आरोपीला, जिला संरक्षण मिळायला हवं होतं, तिच्याच सन्मानावर गदा आणण्याचा प्रयत्न झालाय. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक…राजेश जाधवने आरोपी महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. त्यानं कोठडीत असलेल्या महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली, तसेच तुझ्या मुलीला रात्रभर माझ्याकडे पाठव, 10 हजार देतो, अशी निर्लज्जपणाची भाषाही त्याने वापरल्याचा गंभीर आरोप पीडित महिलेनं केलाय. याप्रकरणी, आरोपीला अटक करण्यात आली असून न्यायालयाने 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

अकोल्यात पोलीस कोठडीत महिला कैद्याला शरीरसुखाची मागणी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) राजेश जाधवची न्यायालयाने कारागृहात रवानगी केलीय. आज अकोला जिल्हा न्यायालयाने राजेश जाधवला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. अकोल्यातीलं सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या लॉकअप’मध्येचं ASI राजेश जाधव याने अटकेतील महिला आरोपीकडे शरीरसुखाची मागणी केलीय होती. जाधव याने अटकेतील महिलेला तुझ्या मुलीच वय किती? 10 हजार रुपये देतो, रात्रभर मुलीला माझ्याकडे पाठव, अशी मागणी केल्याचा आरोप होता. या प्रकरणाचे राज्यभरात पडसाद उमटले. एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता, यात वरिष्ठांनी या ‘एएसआय’च्या कानशिलात मारण्याचा प्रयत्न केला होता.

प्यायला पाणी, मोबाइलही वापरला

आरोपी जाधव विरोधात पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल असून पोलिस खात्यातून त्याच निलंबन झालय. दरम्यान, आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपी त्याची रवानगी अकोला जिल्हा कारागृहात केली आहे. तर, आजच अटकेतील महिलासमोर जाधवची ओळख परेड होणार आहे. तहसीलदारांच्या उपस्थितीत कारागृहात ही ओळख परेड होणार आहे. न्यायालयाने याची परवानगी दिली. दरम्यान, कारागृहात रवानगी होण्यापूर्वी आरोपी जाधव दृष्ट्यांमध्ये कुणाशी तरी फोनवर बोलताना दिसतोय. त्याला बोलण्यासाठी व्हीआयपी ट्रीटमेंट म्हणून बोलण्यासाठी फोन उपलब्ध करून देण्यात आलय का? असा प्रश्न विचारला जातोय.

हेही वाचा

पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये जोरदार पाऊस, अवकाळीने झोडपलं; रस्त्यावर पाणी, वाहनं जागेवरच थांबली, पाहा PHOTOS

आणखी वाचा

Comments are closed.