अशोक खरातला तिसऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी, आता चौथ्या गुन्ह्यात SIT घेणार ताबा; आजच्या सुन

अशोक खरात कोर्टात सुनावणी नाशिकचा भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) याच्या अडचणींत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज (दि. 13 एप्रिल) खरातची तिसऱ्या गुन्ह्यातील पोलीस कोठडी (Police Custody) संपल्याने त्याला नाशिक न्यायालयात (Nashik Court) हजर करण्यात आले होते. न्यायालयाने या गुन्ह्यात त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली असून, चौथ्या गुन्ह्यात तपासासाठी त्याचा ताबा मिळवण्याकरिता एसआयटीने (SIT) हालचाली तीव्र केल्या आहेत.

Ashok Kharat Court Hearing: व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी

सुरक्षेच्या कारणास्तव अशोक खरातला आज ऑनलाइन (Video Conferencing) पद्धतीने न्यायालयासमोर हजर करण्यात आले. सुनावणी सुरू होताच न्यायाधीशांनी खरातचे नाव विचारले आणि पोलिसांविरोधात मारहाणीची काही तक्रार आहे का? अशी विचारणा केली. त्यावर खरातने ‘नाही’ असे उत्तर दिले. यावेळी सरकारी वकील आणि आरोपीचे वकील सचिन भाटे न्यायालयात उपस्थित होते.

Ashok Kharat Court Hearing: चौथ्या गुन्ह्यात ताबा मिळवण्याची विनंती

तिसऱ्या गुन्ह्यातील तपासासाठी खरातला पोलीस कोठडी देण्यात आली होती, ज्याची मुदत आज संपली. एसआयटीने आतापर्यंत झालेल्या तपासाचा तपशील न्यायालयात सादर केला. सरकारी पक्षाने तिसऱ्या गुन्ह्यातील पोलीस कोठडीचा हक्क अबाधित राखून खरातला चौथ्या गुन्ह्यात वर्ग करण्याची परवानगी मागितली आहे.

Ashok Kharat Court Hearing: वैद्यकीय तपासणीनंतर खरातचा ताबा घेण्याच्या सूचना

खरातचे वकील चौथ्या गुन्ह्यासाठी ‘वकीलपत्र’ घेणार आहेत. न्यायालयाने खरातला तिसऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी सुनावली असली, तरी आता एसआयटी चौथ्या गुन्ह्यात त्याचा ताबा घेऊन पुन्हा पोलीस कोठडी मिळवण्यासाठी प्रयत्न केले. यानंतर आरोपी तुरंगात जाईल, त्याची वैद्यकीय तपासणी केली जाईल, त्यानंतर त्याचा ताबा घेण्याचा सूचना कोर्टाने पोलिसांना दिल्या. तर अशोक खरातला उद्या पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यामुळे उद्याच्या सुनावणीत नेमके काय घडणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Ashok Kharat: अशोक खरात प्रकरणात ईडीचे धाडसत्र

दरम्यान, भोंदू अशोक खरात प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय (ED) कडून मोठी कारवाई सुरू करण्यात आली आहे. नाशिक, पुणे आणि शिर्डी परिसरात एकाच वेळी छापेमारी करत ईडीने तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत. शिर्डी परिसरातील समता पतसंस्थेच्या राहाता शाखेत ईडीचे पथक दाखल झाले असून, अशोक खरात नॉमिनी असलेल्या सुमारे 100 खात्यांची चौकशी सुरू आहे. या खात्यांमधून 60 कोटींहून अधिक व्यवहार झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

नाशिकमध्ये 5, पुण्यात 3 आणि शिर्डीत 3 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. समता पतसंस्थेशी संबंधित आर्थिक व्यवहारांची सखोल पडताळणी सुरू असून, खरातच्या मालमत्ता आणि निधीच्या स्रोताचा शोध घेतला जात आहे. नाशिकमधील तृप्तबाला निवासस्थानी आयकर विभागाकडूनही छापेमारी करण्यात आल्याची माहिती आहे. खरेदी-विक्रीशी संबंधित कागदपत्रांची पडताळणी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

आणखी वाचा

Ashok Kharat Crime news: अशोक खरातचं जेवण कमी झालं, बायकोचा पत्ता विचारताच म्हणाला, ‘देवाला माहिती…’

आणखी वाचा

Comments are closed.