खरातच्या मालमत्तांची ढीगभर कागदपत्रं ईडीच्या हाती; घर ,फार्महाऊस अन् कार्यालयात दोन गोण्या भरल्
नाशिक: भोंदू अशोक खरातच्या मालमत्तांची ढीगभर कागदपत्रं ईडीने (ED) जप्त केली आहेत. ईडीच्या (ED) तेरा सदस्य असलेल्या पथकाकडून भोंदू खरातच्या (Bhondu Ashok Kharat) निवासस्थान आणि कार्यालयांवर छापे टाकण्यात आले, यामध्ये महत्त्वाची कागदपत्रे, माहिती हस्तगत करण्यात आली आहे. दोन दिवसांच्या छापेमारीत ईडीच्या हाती मोठं घबाड लागल्याची माहिती आहे. घराच्या मालमत्ता आणि आर्थिक व्यवहारांसंदर्भातील हजारो कागदपत्र ईडीच्या ताब्यात असल्याचं समोर आलं आहे. अशोक खरातच्या घर ,फार्महाऊस आणि कार्यालयातून जवळपास दोन गोण्या भरतील एवढे कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत. खरात सोबत आर्थिक व्यवहार केलेल्या अधिकाऱ्यांची देखील ईडी कडून चौकशी होणार असल्याची माहिती आहे. अशोक खरातने अधिकाऱ्यांशी जवळीक साधत मोक्याच्या ठिकाणी घेतलेल्या कोट्यावधींच्या मालमत्ताची चौकशी होणार आहे.(Nashik Crime News)
अशोक खरात : खरात यांच्या सासू पार्वती शिंदे म्हणाल्या.
तर खरातच्या सासू पार्वती शिंदेंनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, नातवांना खाऊपिऊ घालण्यास मी आलेय, जावयाने काय केलं मला माहीती नाही. मुलगी कल्पना पंधरा दिवस झाले घरी नाही, कुठे गेली माहीत नाही, काल घरी अधिकारी आले होते. त्यांनी पिशवीभर कागदपत्रे नेली, असे भोंदू अशोक खरातच्या सासूबाई व कल्पना खरातच्या आई पार्वती शिंदे (Parvati Shinde) यांनी येथे एका माध्यमांशी बोलताना सांगितले. भोंदू खरातच्या (Bhondu Ashok Kharat) कर्मयोगी नगरातील बंगल्यावर सोमवारी ईडी तसेच आयकर विभागाच्या संयुक्त पथकाने छापा टाकला होता. त्यानंतर खरातच्या सासूशी (Parvati Shinde) माध्यमांनी संवाद साधला असता त्या म्हणाल्या की, मी काय सांगू जावयाने काय केले आहे, मला काहीच माहिती नाही. मुलगी अन् जावई नसल्याने मला येथे बोलावले आहे. नातवांचे जेवण वगैरे याकडे लक्ष देत आहे.(Parvati Shinde)
घरी अशोक खरात (Bhondu Ashok Kharat) याचा मुलगा, भाचा, एक मुलगी, जावई आहेत. तुम्हाला मुलगी कल्पनाचा फोन येतो का? या प्रश्नावर पार्वती (Parvati Shinde) यांनी तिचा फोनच येत नाही घरी. ती कुठे आहे माहीत नाही असे सांगितले. काही अधिकारी आमच्या घरी अनेक तास चौकशी करीत होते. यात त्यांनी अनेक कागदपत्र तपासले. जाताना पिशवीभर कागदपत्रे घेऊन गेले. ते कसले होते मला माहीत नाही. मला अधिकाऱ्यांनी काही प्रश्न विचारले नाही. (Nashik Crime News)
आणखी वाचा
Comments are closed.