महिला पोलीस हाऊसकिपिंग कर्मचाऱ्याच्या वेषात, निदा खानच्या ‘त्या’ प्लॅनची माहिती कानावर पडली, ना

नाशिक: नाशिकच्या कंपनी मधील धर्मातर प्रकरणाचे मलेशिया कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. पिडीत महिलेला मलेशियामध्ये पाठविण्याचा कट असल्याचा संशय (Nashik Crime News) व्यक्त करण्यात आला आहे. यासाठी पिडीतेला पासपोर्ट काढण्यासाठी दबाव टाकल्याची माहिती आहे. मलेशियामधील व्यक्तीशी फोनवरुन संवाद साधल्याची ही सूत्रांकडून माहिती समोर आली आहे. नामांकित कंपनीमध्ये असणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड करण्यासाठी महिला पोलिसांचे पथक तैनात झाले होते. हाऊस किपिंगचे काम करताना महिला पोलिसांनी माहिती मिळवली होती. साध्या वेशात कंपनीत कर्मचारी असल्याचे वावरत तपास केला होता. (Nashik Crime News)

अनेक बारीक घडामोडीवर महिला पोलिसांची करडी नजर होती. या प्रकरणातील महिला आरोपी निदा खान अद्याप फरार (Nashik Crime News) आहे. निदा खानकडून महत्वपूर्ण माहिती हाती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महिला पोलीस कर्मचारी हाऊसकिपिंग कर्मचारी म्हणून लक्ष ठेलून होती, अशी माहिती आहे.(Nashik Crime News)

Nashik Crime IT Company: नाशिक बहुराष्ट्रीय कंपनी अत्याचार प्रकरणात नवीन अपडेट समोर

नाशिक बहुराष्ट्रीय कंपनी अत्याचार प्रकरणात नवीन अपडेट समोर आली आहे. तरुणी आणि महिलांना आपल्या जाळ्यात अडकविण्यासाठी ते वेगवेगळी शक्कल लावत होते. महिला कर्मचाऱ्यांना मानसिक दबावाखाली ठेवण्यासाठी ते वेगवेगळे उपाय करत असल्याची माहिती समोर आली आहे. आपली मोहिम फत्ते करण्यासाठी हे संशयित कामाची वेळ संपल्यानंतरही अधिक वेळ कंपनीत थांबून कंपनीचे काम करत असल्याचे भासवून संशयास्पद प्रकार करत असल्याचेही तपासातून समोर आले आहे. याकरिता कंपनीच्या मालमत्तेचाही वापर झाल्याची सूत्रांची माहिती समोर आली आहे. व्हॉट्सॲपच्या माध्यमातून रणनीती आखल्यानंतर हे ऑपरेशन राबवले जायचे, अशी माहिती समोर आली आहे.

Nashik Crime IT Company: नेमकं प्रकरण काय?

नाशिकमधील मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका मल्टिनॅशनल आयटी कंपनीतील महिलांवरील लैंगिक शोषण प्रकरणाने खळबळ उडाली आहे. कंपनीतील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संगनमत करून आर्थिकदृष्ट्या दुर्बल पार्श्वभूमीतील महिला व तरुणींना लक्ष्य केल्याचा आरोप आहे. त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन लैंगिक अत्याचार (Crime News), आर्थिक छळ तसेच जबरदस्तीने धर्म स्वीकारण्यास भाग पाडल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी नाशिकमध्ये 9 गुन्हे दाखल झाले असून आता SIT कडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु आहे. असे असताना तरुणी आणि महिलांवर लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणात महिला आरोपी असलेली निदा खान मात्र अद्याप फरारच असल्याची माहिती समोर आली आहे. (Nashik Crime News)

Nashik Crime News: पोलिसांचे ‘स्पेशल ऑपरेशन’: वेशांतर करून पुरावे गोळा

हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आणि कॉर्पोरेट क्षेत्राशी संबंधित असल्याने नाशिक पोलिसांनी कमालीची गोपनीयता पाळली. संशयित आरोपी मीटिंगच्या नावाखाली महिलांशी अश्लील वर्तन करत असल्याची माहिती मिळताच, महिला वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सात महिला कर्मचाऱ्यांच्या पथकाने कंपनीत वेशांतर करून प्रवेश केला. या पथकाने प्रत्यक्ष कंपनीत वावरत असताना संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवले. मीटिंग दरम्यान होणारे अश्लील हावभाव आणि गैरवर्तन पोलिसांनी स्वतः डोळ्यांनी पाहिले. तसेच, सुमारे 40 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून ठोस पुरावे गोळा केल्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.