IPL 2026 – चूक झाल्याचे मान्य करा अन् ‘त्या’ खेळाडूला बाकावर बसवा, वीरेंद्र सेहवागने KKR ला झापलं

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

इंडियन प्रीमियर लीगच्या 19 व्या हंगामामध्ये तीन वेळच्या विजेत्या कोलकाता नाईट रायडर्सची आतापर्यंतची कामगिरी सुमार राहिली आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कोलकाताच्या संघाला यंदा विजयाचे खातेही उघडता आलेले नाही. कोलकाताने पाच सामने खेळले असून चार सामन्यात पराभव स्वीकारला, तर एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे. मंगळवारी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध झालेल्या पराभमुळे कोलकाताचा संघ गुणतालिकेत तळाला पोहोचला आहे. यानंतर टीम इंडियाचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग याने केकेआर संघ प्रशासनावर जोरदार टीका केली. वीरूने खराब फॉर्मात असलेल्या कॅमेरून ग्रीन याला बाकावर बसवण्याचा सल्ला केकेआरला दिला आहे.

ऑस्ट्रेलियचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीन हा आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा परदेशी खेळाडू ठरला होता. मात्र या हंगामातील 5 सामन्यांत त्याने केवळ 56 धावा केल्या असून त्याला फक्त 1 बळी घेता आला आहे. चेन्नईविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यातही तो शून्यावर बाद झाला. यामुळे वीरेंद्र सेहवाग याने केकेआरच्या संघ प्रशासनाला चांगलेच झापले. कॅमेरून ग्रीनला 25.20 कोटी रुपयांना खरेदी करणे ही मोठी चूक होती, असे स्पष्ट मत सेहवागने व्यक्त केले आहे. ‘हिंदुस्तान टाईम्स‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

Comments are closed.