कोट्यवधींची संपत्ती, खेळाचीही आवड; तरीसुद्धा अभिषेक बच्चन यानं IPL टीम का खरेदी केली नाही?

अभिषेक बच्चनने कधीही आयपीएल संघ विकत घेतला नाही: सध्या भारतात आयपीएल (Indian Premier League) फिवर सुरू आहे, त्यामुळे क्रिडाप्रेमींचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. IPL च्या 2026 च्या 19 व्या सीझनमध्ये, कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders), सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad), मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांसारखे संघ एकमेकांशी भिडताना दिसत आहेत. आयपीएलचा रणसंग्राम फक्त आणि फक्त क्रिकेटपुरताच मर्यादित नाही, यामध्ये सिनेक्षेत्रातील अनेक दिग्गजसुद्धा उतरलेत. शाहरुख खान (Shah Rukh Khan), जूही चावला (Juhi Chawla) आणि प्रिती झिंटा (Preity Zinta) यांनी खेळाडू खरेदी करुन आपापल्या टीम विकत घेतल्यात. अशातच एक असा सेलिब्रिटी आहे, जो नेहमी आयपीएलच्या (IPL 2026) मैदानात दिसतो, पण फक्त सामना पाहताना, ना त्यानं कधी टीम खरेदी केली आणि कोणत्याही प्रँचायझीसोबत (IPL Franchises) हातमिळवणी केलीय. पण, तरी तो आयपीएल सामन्यांसाठी हजेरी लावताना दिसतो.

आम्ही ज्या अभिनेत्याबाबत बोलतोय, तो अभिनेता म्हणजे, बॉलिवूडचा स्टारकीड अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan). बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) अभिषेक बच्चन हा केवळ आपल्या प्रोफेशनल कामगिरीमुळेच नाहीतर आपल्या वैवाहिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. बॉलिवूडमधील कामाव्यतिरिक्त, अभिषेक बच्चनला खेळाविषयी प्रचंड आवड आहे. किंबहुना, त्यानं खेळांशी संबंधित अनेक इव्हेंट्समध्ये गुंतवणूक केली आहे, तो ‘जयपूर पिंक पँथर्स’ (Jaipur Pink Panthers) या कबड्डी संघाचा (Professional Kabaddi Team) मालक आहे. याव्यतिरिक्त, त्याच्या मालकीचा एक फुटबॉल लीग संघही (Football League) आहे. तरीही, खेळांमध्ये विशेष रुची असलेला आणि कोट्यवधींची संपत्ती असलेला अभिषेक बच्चन यानं, आजवर IPL संघ विकत का नाही घेतला? असा प्रश्न सध्या चर्चेत आहे.

अभिषेक बच्चननं IPL टीम का खरेदी केली नाही?

अभिषेक बच्चन हा आपल्या वैयक्तिक आयुष्यात खेळांचा एक मोठा चाहता आहे. कबड्डी आणि फुटबॉल या दोन्ही क्षेत्रांत त्याच्या मालकीचे यशस्वी संघ आहेत. मात्र, त्यानं अद्याप इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) कधीच प्रवेश केलेला नाही. ‘फोर्ब्स’ (Forbes) सोबतच्या नुकत्याच झालेल्या एका संभाषणात, अभिषेक बच्चन यानं आपण आयपीएल संघ का विकत घेतला नाही, याचं स्पष्टीकरण दिलंय.

अभिनेता अभिषेक बच्चन म्हणाला की, “ही गोष्ट खूपच रंजक आहे. आयपीएल आवडत नाही, असा एकही माणूस मला तरी माहीत नाही. मला वाटतं की, क्रीडा मनोरंजनाच्या (Sports Entertainment) क्षेत्रातील तो एक सर्वोच्च आविष्कार आहे. मला IPL शी जोडलं जायला नक्कीच आवडलं असतं, पण खरं सांगायचं तर, जेव्हा याची सुरुवात झाली, तेव्हा ते आर्थिकदृष्ट्या खूपच महाग होते. त्या वेळी, मी एक मर्यादित अनुभव असलेला अभिनेता होतो, माझे सिनेमे बॉक्स ऑफिसवर नुकतेच चांगली कामगिरी करू लागले होते. मी नुकताच बऱ्यापैकी उत्पन्न मिळवू लागलो होतो आणि एखादा संघ विकत घेणं, हे माझ्या बजेटच्या (आर्थिक क्षमतेच्या) पूर्णपणे बाहेरची गोष्ट होती…”

अभिषेक बच्चननं पुढे असंही स्पष्ट केलं की, केवळ आर्थिक बाबींचा विचार न करता, आपण या खेळामध्ये प्रत्यक्षपणे कोणती ठोस मूल्य (Value) वाढवू शकतो, असा प्रश्नही त्यानं स्वतःला विचारला होता. तो म्हणाला, “सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, या खेळामध्ये मी नेमकं कोणतं विशिष्ट योगदान देऊ शकेन, हेच मला समजत नाही. पायाभूत सुविधांच्या (Infrastructure) बाबतीत, बीसीसीआयनं (BCCI) उत्कृष्ट काम केलंय, मग अशा परिस्थितीत ‘मी’ नक्की काय वेगळं देऊ शकणार होतो? मी अशा प्रकारचा माणूस नाही, ज्याला केवळ प्रेक्षक गॅलरीत बसून गर्दीकडे हात हलवण्यात आनंद मिळतो, तेही फक्त यासाठी की, लोकांनी माझ्याकडे बोट दाखवून म्हणावं, “अरे, पाहा! एक स्टार आलाय…”, मी मुळात तशा प्रकारचा माणूसच नाही…”

टीम ओनरशिप भाऊ अभिषेक बच्चन बद्दल? (टीम ओनरशिपवर अभिषेक बच्चन)

अभिषेक बच्चननं संघमालक म्हणून आपल्या कार्यपद्धतीवरही भाष्य केलंय. अभिषेक बच्चन म्हणाला की, “जर तुम्ही सामन्यांदरम्यान मला पाहिलं असेल, तर तुमच्या लक्षात आलं असेल की, मी त्यात पूर्णपणे मग्न असतो. मी खेळाडूंसोबत बसतो, त्यांच्या अनुभवात मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून सहभागी होतो. शक्य असल्यास, मी त्यांना प्रशिक्षणही देतो. ते दररोज काय खातात, हे मी स्वतः अप्रूव्ह करतो. मी प्रत्येक लहान-सहान गोष्टींवर बारकाईनं लक्ष ठेवतो. मला काम करण्याची हीच पद्धत अधिक पसंत आहे…”

विशेषतः क्रिकेटबद्दल बोलताना अभिषेक म्हणाला, “मी यात काय योगदान देऊ शकेन, याबद्दल मला खात्री नव्हती, कारण त्या वेळी माझ्याकडे खेळांविषयी तितकं सखोल ज्ञान नव्हतं, जितकं आज माझ्याकडे आहे. मला इतर खेळांविषयी अधिक माहिती होती आणि क्रिकेटमध्ये मी नेमकी कशी मदत करू शकेन, याबद्दल मला स्पष्टता नव्हती. तरीही, माणसानं कधीच ‘नाही’ असं म्हणू नये, त्यामुळे कदाचित भविष्यात काहीतरी घडून येईल…”

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bhushan Pradhan Marriage: मराठीतल्या चॉकलेट बॉय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्याच्या लग्नाची जोरदार चर्चा, अखेर मौन सोडलं; ‘स्वप्नसुंदरी’चं नाव सांगूनच टाकलं

आणखी वाचा

Comments are closed.