विनोद कांबळींना ‘ब्रेन स्ट्रोक’चा धोका, सचिन तेंडुलकरसह माजी क्रिकेटपटू मदतीसाठी धावले, नेमकं क

विनोद कांबळी हेल्थ अपडेट: भारतीय क्रिकेट विश्वातील एकेकाळचा चमकता तारा विनोद कांबळी (Vinod Kambli) सध्या अत्यंत कठीण प्रसंगातून जात आहेत. कांबली यांना गंभीर आजाराने ग्रासले असून त्यांना ‘ब्रेन स्ट्रोक’चा मोठा धोका असल्याचा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. या कठीण काळात त्यांचे बालपणीचे मित्र सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांच्यासह अनेक माजी क्रिकेटपटूंनी मदतीचा हात पुढे केला आहे.

Vinod Kambli Health Update: मेंदूत गाठ आणि विस्मरणाचा आजार

कांबळी यांचे मित्र मार्कस कौटो यांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद कांबळी यांच्या मेंदूमध्ये रक्ताची गाठ (Clot) तयार झाली आहे. सुरुवातीच्या काळात याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आता ती काढणे कठीण झाले आहे. यामुळे त्यांच्या स्मरणशक्तीवर गंभीर परिणाम झाला असून, त्यांना साध्या गोष्टीही आठवत नाहीत. प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. आदिल छागला यांनी स्पष्ट केले आहे की, त्यांची ही स्थिती ‘ब्रेन स्ट्रोक’कडे झुकत आहे.

Vinod Kambli Health Update: स्मरणशक्ती गेल्याने वाढला धोका

कांबळी यांना आपल्याला काय आजार आहे आणि काय टाळायचे आहे, याचे भान राहत नाही. त्यांनी मद्यपान सोडले असले तरी, विस्मरणापोटी ते अनेकदा रस्त्यावरील अनोळखी व्यक्तींकडे किंवा रिक्षाचालकांकडे सिगरेट मागतात. लोक त्यांना ‘कांबळी’ म्हणून प्रेमाने सिगरेट देतात, परंतु हीच सिगरेट त्यांच्या जीवावर बेतू शकते, अशी भीती त्यांच्या मित्रांनी व्यक्त केली आहे.

Vinod Kambli Health Update: आर्थिक मदतीसाठी ‘व्हॉट्सॲप ग्रुप’

कांबळी यांची आर्थिक स्थितीही बेताची असल्याने त्यांच्या मित्रांनी पुढाकार घेतला आहे. मार्कस कौटो यांनी सांगितले की, त्यांनी माजी क्रिकेटपटूंचा एक व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला आहे. या ग्रुपच्या माध्यमातून अनेक खेळाडू नाव न सांगता कांबळी यांना आर्थिक मदत करत आहेत. यामध्ये सचिन तेंडुलकर देखील सक्रियपणे लक्ष देऊन असल्याचे समजते. काही काळापूर्वीच कांबळी यांनी ‘युरिनरी इन्फेक्शन’वर मात केली आहे. सध्या ते नीट चालत असले तरी, मेंदूतील गुंतागुंत हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा अडथळा ठरत आहे. त्यांचे मित्र आणि डॉक्टरांची टीम त्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहे.

Vinod Kambli: विनोद कांबळींची कारकीर्द

विनोद कांबळी यांनी 1993 ते 2000 दरम्यान भारतासाठी 17 कसोटी आणि 104 एकदिवसीय सामने खेळले. विनोद कांबळी 1000 कसोटी धावा करणारे सर्वात जलद भारतीय फलंदाज आहे. हा एक विक्रम आजपर्यंत कायम आहे. 1991 मध्ये आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुरू करूनही, भारतासाठी 104 एकदिवसीय सामने आणि 17 कसोटी सामने खेळूनही त्यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द एका दशकापेक्षा कमी काळ टिकली. कांबळी यांनी 17 कसोटी सामन्यात 54.20 च्या सरासरीने 1084 धावा केल्या. यामध्ये चार शतके आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय, त्यांनी 104 एकदिवसीय सामन्यांमध्ये 32.59 च्या सरासरीने 2477 धावा केल्या. यामध्ये दोन शतके आणि 14 अर्धशतकांचा समावेश आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 129 सामन्यांमध्ये 59.67 च्या सरासरीने 9965 धावा केल्या. यामध्ये 35 शतके आणि 44 अर्धशतकांचा समावेश आहे.

आणखी वाचा

MI vs PBKS IPL 2026: रोहित शर्मा बाद, दानिश मालेवार इन…; पंजाब विरुद्ध मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन

आणखी वाचा

Comments are closed.