20 दिवसांपासून फरार; नाशिकमधील धर्मांतर रॅकेटची ‘मास्टरमाइंड’ निदा खान नेमकी आहे तरी कोण? मुलीं

नाशिक: नाशिकच्या नामांकित कंपनीमधील महिला अत्याचार बळजबरीने धर्मांतर (Nashik conversion racket) प्रकरणी नाशिकच्या मुंबई नाका आणि देवळाली पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सात जणांना अटक केली असून मुख्य सूत्रधार असलेली निदा खान मात्र गेल्या 20 दिवसांपासून फरार आहे. कंपनीमध्ये मॅनेजर आणि टीम लीडर म्हणून निदा खान काम बघत होती. आरोपींना दररोज कामाचे नियोजन देण्यासाठी होणाऱ्या मीटिंगमध्ये हिंदू मुलींची छळवणूक आणि त्यांच्यावर धर्मांतराचा तगादा लावण्यासाठी निदा खान (Nida Khan) ऑपरेशन डिपार्टमेंट म्हणून या सर्व गोष्टी घडवून आणत असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासामध्ये समोर आली आहे.

गेला वीस दिवसांपासून निदा खान फरार आहे. निदा खानच्या (Nida Khan) मागावर पोलिसांचे तीन पथक रवाना करण्यात आले आहे, मात्र अद्यापही तिचा ठावठिकाणा लागलेला नाही. या कंपनीतील तरुणींना आणि महिलांना मानसिक छळवणूक आणि लैंगिक अत्याचार होताना धर्मांतर करण्याचा मुख्य उद्देश ठेवून अनेक कारनामे या निदा खानच्या सांगण्यावरून घडत होत्या अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. कंपनीची HR अश्विनी चैनाणी हिला पोलिसांनी अटक केली आणि तिची कसून चौकशी केली असता. या प्रकरणात निदा खान (Who Is Nida Khan) ही हे सर्व घडवून आणत असल्याचं पोलीस तपासात समोर आली आहे.

याप्रकरणी सहा पुरुष आरोपी तर दोन महिला आरोपी असल्याने हे प्रकरण दररोज एका व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून घडवून आणले जात होते हा धक्कादायक उलगडा झाल्याने या प्रकरणात आंतरराष्ट्रीय रॅकेट सक्रिय असल्याचा तपास यंत्रणेला संशय आहे. मात्र धर्मांतर सारखा गंभीर प्रकार एका नामांकित कंपनीमध्ये घडवणारी ही निदा खान नेमकी कोण? असा प्रश्न समोर आला आहे.

Who Is Nida Khan:  कोण आहे निदा खान?

बोट – निदा एजाज खान
वय – 26 वर्ष
– कंपनीतील टीम लीडर ची प्रमुख आणि कंपनीत काम करणाऱ्या मुलींची टार्गेट टीम प्रमुख म्हणून काम करत होती.
– 2021पासून निदा खान ही कंपनीत काम करत होती.
– नाशिकच्या द्वारका परिसरात निदा खान हिचे माहेर असून तिचे पती एका खाजगी कंपनीत नोकरी करत असल्याची माहिती आहे.
– कंपनीत नवीन महिला किंवा तरुणी कामाला आल्यानंतर त्यांना या आरोपीकडून ट्रेनिंग देण्याची शिफारस निदा खान करत असे.
– आरोपींच्या प्रेमात आणि ठरवलेल्या धर्मांतर षड्यंत्रात मुली अडकवण्यासाठी तिची मुख्य भूमिका होती.
– या प्रकरणात आर्थिक मदत लागत असेल तर इतर आर्थिक मदत आरोपींना आवश्यक नुसार करत होती.
– निदा खान तिच्या अटकेमुळे या संपूर्ण प्रकरणातील मास्टरमाइंड नेमका कोण आहे याचा खुलासा होणार असल्याने तिची अटकेची कारवाई महत्त्वाची आहे.
– या संपूर्ण प्रकरणाची सूत्रधार म्हणून निदा खान ही असल्याने पोलिचे तीन पथक निदा खानच्या मागावर असून तपास सुरू आहे.

Nida Khan : निदा खान ही एका सर्वसामान्य घरातील पण…

निदा खान ही एका सर्वसामान्य घरातील असल्याची माहिती आहे. तिचे लग्न 2021-22 मध्ये एजाज खान सोबत झाल्याची माहिती असून एका नामांकित महाविद्यालयात तिचे शिक्षण ही पूर्ण झाल्याची माहिती आहे. अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करून एका नामांकित कंपनीमध्ये निदा ही सॉफ्टवेअर इंजिनीयर म्हणून काम करत असल्याचा देखील समोर आले आहे. मात्र या प्रकरणात निदा खानवर मुख्य सूत्रधार म्हणून आरोप झाल्याने या प्रकरणात तिची अटक ही नाशिक पोलिसांसाठी आणि या प्रकरणातील उलगडा होण्यासाठी सर्वाधिक निर्णय होणार आहे. निदा खानचे आंतरराष्ट्रीय नेटवर्क असल्याचा देखील संशय तपास यंत्रणे कडून व्यक्त केला जातोय.

Nashik News: कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू

नाशिकच्या नामांकित कंपनीत अत्याचार आणि धर्मतर प्रकरण सुरू असल्याचा खुलासा झाल्यानंतर या प्रकरणाचा सखोल तपास होत आहे. या प्रकरणी आता कपंनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जात आहे. कंपनीतील 150 कर्मचाऱ्यांना तूर्त सोमवारपासून घरातून काम (Work From Home) करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कंपनीच्या दिल्लीतील टीमकडून झाडाझडती आणि  चौकशी सुरू आहे. धर्मांतर प्रयत्न आणि लैंगिक अत्याचार प्रकरणाची कंपनीकडून अंतर्गत तपासणी सुरू आहे. कर्मचाऱ्यांच्या जबाबात गंभीर तक्रारी केल्याची सूत्रांची माहिती आहे. कामगार उपायुक्त कार्यालयाकडून देखील कंपनीत चौकशी सुरू आहे. तपासासाठी गेलेल्या टीमला कंपनीत एकही कर्मचारी आढळला नाही. शॉप अ‍ॅक्ट आणि कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. राष्ट्रीय महिला आयोगाची टीम 18 एप्रिलला नाशिकमध्ये पाहणी करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.