आयटी कंपनीत धर्मांतर आणि लैंगिक शोषण, धागेदोरे कुठपर्यंत ते तपासणार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

नाशिकच्या नामांकित आयटी कंपनीतील धर्मांतर आणि महिलांच्या लैंगिक शोषणाचे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. यासंदर्भात आम्ही अत्यंत कठोर कारवाई करत आहोत. या नाशिक मॉडय़ूलचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचले आहेत, याचा तपास करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्रकारांनी नाशिकच्या धर्मांतर घटनेसंदर्भात सरकारची भूमिका आणि कारवाई संदर्भात प्रश्न केला. त्यावर फडणवीस यांनी एका मॉडय़ूलअंतर्गत हे सर्व करण्यात आल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणात पुणालाही पाठीशी न घालण्याची भूमिका टीसीएसने घेतली आहे. टीसीएसच्या प्रमुखांनीही या प्रकरणाची निंदा केली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे. आम्ही केंद्रीय तपास यंत्रणांनाही या प्रकरणाची माहिती दिली आहे आणि आवश्यकतेप्रमाणे त्यांची मदतही यात घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले.

Comments are closed.