महिलेने लग्नास दिला नकार, संतापलेल्या होणाऱ्या नवऱ्याने थेट प्रियकराचा काढला काटा; मुंबईतील ‘त्
मुंबई क्राईम न्यूज: मुंबईच्या वांद्रे (Bandra) येथील खेरवाडी (Kherwadi) परिसरात झालेल्या अभिनव कुमार प्रकरणाचा मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अवघ्या 60 तासांत यशस्वी छडा लावला आहे. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी मुख्य आरोपी निरज कुमार विलास चौधरी (31) याला कोलकाता विमानतळावरून (Kolkata Airport) ताब्यात घेतले. महिलेने लग्नास नकार दिल्याने निर्माण झालेल्या रागातून हा प्रकार घडल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
Mumbai Crime News: नेमकी घटना काय?
13 एप्रिल रोजी खेरवाडीतील कल्पतरू स्पार्कल परिसरात अभिनव कुमार या तरुणाच्या गळ्यावर वार करून त्याला संपवण्यात आले होते. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली.
Mumbai Crime News: प्रकरणामागे ‘लव्ह अँगल’
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत अभिनव कुमार एका महिलेसोबत रिलेशनशिपमध्ये होता. मात्र, त्याच महिलेचे लग्न आरोपी निरज चौधरी याच्याशी ठरले होते. दरम्यान, त्या महिलेने आरोपी निरजसोबत लग्न करण्यास नकार दिला. आपला विवाह मोडण्यास अभिनव कुमार जबाबदार असल्याचा संशय निरजला होता. याच रागातून निरजने आपल्या साथीदारांच्या मदतीने अभिनवचा पाठलाग केला आणि त्याला संपवले.
Mumbai Crime News: असा लावला छडा
गुन्हा केल्यानंतर आरोपी निरज मुंबईतून पळून गेला होता. तो पकडला जाऊ नये म्हणून त्याने रेल्वेने अनेक ठिकाणी प्रवास केला. पोलिसांनी त्याचे लोकेशन ट्रॅक करण्यासाठी तांत्रिक सर्व्हेलन्सचा वापर केला. आरोपीला पकडण्यासाठी मुंबई पोलिसांनी नागपूर आणि कोलकाता येथे विशेष पथके रवाना केली होती.
Mumbai Crime News: कोलकाता एअरपोर्टवर थरारक कारवाई
आरोपी प्रथम रेल्वेने हावडा स्टेशनवर पोहोचला, मात्र पोलिसांची चाहूल लागताच त्याने तिथूनही पळ काढला. शेवटी तो कोलकाता विमानतळावरून दिल्लीला पळून जाण्याच्या तयारीत असताना, पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. तांत्रिक कौशल्य आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी अवघ्या 60 तासांत या गुन्ह्याचा छडा लावला.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.