अशोक खरातचा जेलमधील मुक्काम वाढला, पाचव्या गुन्ह्यात पाच दिवसांची पोलीस कोठडी, कोर्टात नेमकं का

अशोक खरात कोर्टात सुनावणी नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) याच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. महिला अत्याचाराच्या पाचव्या गुन्ह्यात विशेष तपास पथकाने (SIT) ताबा घेतल्यानंतर, खरातला आज न्यायालयात हजर करण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आरोपी अशोक खरातला 23 एप्रिलपर्यंत म्हणजेच 5 दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली आहे.

Ashok Kharat Court Hearing: न्यायालयात काय घडलं?

आजची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या (VC) माध्यमातून पार पडली. यावेळी सरकारी वकिलांनी आरोपीच्या कोठडीची मागणी करताना महत्त्वाचे मुद्दे मांडले. “आरोपीची गुन्हे करण्याची पद्धत (Modus Operandi) एक असली तरी पीडित महिला वेगवेगळ्या आहेत. महिलांना गुंगीचे पदार्थ पाजून आणि फसवणूक करून त्याने अत्याचार केले आहेत. या द्रव्यांचा आणि गुन्ह्यामागच्या कटाचा सखोल तपास करण्यासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता आहे,” असा युक्तिवाद सरकारी पक्षाने केला.

Ashok Kharat Court Hearing: आरोपीच्या वकिलांचा युक्तीवाद

दुसरीकडे, आरोपीच्या वकिलांनी कोठडीला विरोध करताना सांगितले की, पहिल्या कोठडीपासून सरकारी पक्ष तेच मुद्दे मांडत आहे. द्रव्य कुठून आणले आणि इतर बाबींचा तपास आधीच झाला असल्याने पुन्हा कोठडीची गरज नाही. मात्र, पीडितांची संख्या आणि गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता न्यायालयाने कोठडी मंजूर केली. अशोक खरातला 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Ashok Kharat Crime News: अशोक खरातच्या अटकेला एक महिना पूर्ण, वाचा घटनाक्रम

17 मार्च : रात्री अकरा वाजता भोंदू अशोक खरातला अटक.

18 मार्च: भोंदू अशोक खरातला नाशिक न्यायालयात केले हजर; सात दिवसांची पोलीस कोठडी.

19 मार्च : भोंदू अशोक खराच्या फोकस कार्यालयावर छापा.

20 मार्च: विशेष तपास पथकाकडे प्रकरण वर्ग.

21 मार्च: महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचा आयोगाचा अध्यक्ष पदाचा राजीनामा.

22 मार्च : तीन महिलांच्या तक्रारीनंतर खरात वर गुन्हे दाखल.

23 मार्च: न्यायालयात पुन्हा सुनावणी साठी केले हजर

24 मार्च: नाशिक पोलीस आयुक्त सह पथकाचे विधिमंडळात अभिनंदन / निवेदन.

25 मार्च: धार्मिक भावना दुखावणे आणि, अमली पदार्थांचा वापर करून महिलांवर अत्याचार केल्या प्रकरणी गुन्हे वाढवले.

26 मार्च: पाच कोटी रुपयांना गंडा घातल्या प्रकरणी खरातवर फसवणुकीचा गुन्हा दाखल.SIT कडून पुरावे जप्त.

27 मार्च : भोंदू अशोक खरातचे ओकेएस कार्यालय सील.

28 मार्च: नेवासातील कापड व्यावसायिकाला खोट्या अंगठ्या दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल.

30 मार्च: न्यायलात हजर आणि तिसऱ्या गुन्ह्यात पुन्हा पोलीस कोठडी.

31 मार्च: कार्यालयासह निवासस्थानी झडती, कागदपत्र हस्तगत.

1 एप्रिल: मुलगा हर्षवर्धन ताब्यात मात्र रात्री उशिरा चौकशी करून सोडले.

2 एप्रिल: ऑफिस बॉय नेच धडा शिकवल्याचे निष्पन्न, प्रकरणाची व्याप्ती वाढली.

3 एप्रिल: मरणाची भीती दाखवल्याप्रकरणी मिरगावची जमीन लुटल्याचे उघडकीस.

4 एप्रिल: पहिल्यांदा अशोक खरातला vc द्वारे न्यायालयात केले हजर ( पुन्हा पोलीस कोठडी)

8 एप्रिल: आठ महिला तक्रारी दाखल, तपासता महत्त्वाचे पुरावे SIT च्या हाती लागले.

13 एप्रिल: नाशिक, पुणे आणि शिर्डी सह 11 ठिकाणावर एकाच वेळी ED चे छापेमारी.

15 एप्रिल: गरोदर महिलेवर अत्याचार आणि मुलगा होईल असा दावा केल्याप्रकरणी चौथ्या गुन्ह्यात 18 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी.

17 एप्रिल: ED कडून अशोक खरातच्या ओकस कार्यालयामध्ये झाडाझडती, शिवनीका संस्थानमध्ये असलेले उपाध्यक्ष डॉ. जितेंद्र शेळके आणि त्यांची पत्नी अनुराधा शेळकेचा अपघाती मृत्यू.

18 एप्रिल: चौथ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी.

19 एप्रिल: पाचव्या गुन्ह्यात 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी.

Ashok Kharat Crime News: खरात प्रकरणी तपासातील महत्त्वाच्या आणि धक्कादायक बाबी.

– भक्तांना घाबरवण्यासाठी वीस फुटाचा नाग रिमोट कंट्रोल ने फिरवत असल्याचा समोर.

– अशोक खरात भक्तांना फसवण्यासाठी दुर्मिळ जडीबुटी आणि हरणाची कस्तुरी यांसह इतर वस्तूंचा वापर करून चमत्काराचा बनाव करत असल्याचा उघड.

– अशोक खरातचे अनेक बडे नेते आणि अधिकाऱ्यांचे जवळचे संबंध असल्याचा उघड आणि त्या संदर्भातील काही फोटो व्हायरल.

– अशोक खरातची पत्नी कल्पना अद्याप फरार अटकपूर्व जामीनासाठी प्रयत्न सुरू.

– अशोक खरातच्या मालमत्तेची चौकशी सुरू असून पाचशे कोटीपेक्षा जास्त आकडा वाढण्याची शक्यता.

आणखी वाचा

Ahilyanagar Crime News: संगमनेरमध्ये ‘भोंदूगिरी’चा पर्दाफाश! मंत्रोच्चाराने दुर्धर आजार बरे करण्याचा दावा करणारा राजेंद्र गडगे गजाआड, ‘दत्तधाम सरकार’ नावाने चालवत होता दरबार

Comments are closed.