Video: जातप्रमाणपत्र,’नॉट रिचेबल’ सहर शेख माध्यमांसमोर; आरोप फेटाळत वानखेडेतील फोटोवरही बोलल्या

मुंबई : ठाणे महापालिकेच्या एमआयएमच्या (AIMIM) नगरसेविका सहार शेख यांच्या बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. गेल्या काही दिवसांपासून ‘नॉट रिचेबल’ असलेल्या सहर शेख यांनी माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका मांडली. तसेच, सहरचे वडील युनूस शेख यांनीही आमचे कागदपत्रे खरे असून आमच्यावरील आरोप हे बिनबुडाचे असल्याचे म्हटले. तत्पूर्वी गुरुवारी अचानक मुंब्रा पोलीस ठाण्यात येऊन त्यांनी पोलिसांशी 15-20 मिनिटे चर्चा केल्यानंतर बाहेर पडताना “करारा जवाब मिलेगा, दोन दिवसात आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू,” असेही म्हटले होते. त्यानंतर, आज सहर आणि तिच्या वडिलांनी पत्रकार परिषदेतून सविस्तर माहिती दिली.

बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणावरुन गेल्या काही दिवसांपासून गायब असलेल्या एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांनी पहिल्यांदाच माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका मांडली. मीडियाच्या माध्यमातून खोटं घराघरात पसरवण्यात आलं आहे, त्यामुळे खरं देखील पोहोचविण्याचा अधिकार आम्हाला आहे. म्हणून, आज पत्रकार परिषद घेत आहे. हे उत्तर द्यायला एवढा वेळ का? हे आम्ही ठरवणार मीडिया तुम्ही नाही ठरवू शकत? असे म्हणत सहर शेख यांनी माध्यमांनाच उलट उत्तर दिले. मीडियाच्या माध्यमातून माझ्यावर जे आरोप झाले ते बिनबुडाचे आहेत, याचा काहीही परिणाम झाला नाही. याप्रकरणात न्यायालयाने अजून निकाल दिला नाही, मग तुम्ही कसे ठरवू शकता? असा सवाल सहरने केला.

तुम्ही एका ताकदवर आमदाराला हरवत आहात, अत्यंत संघर्ष करत, वडिलांना साथ देत तुम्ही निवडणूक जिंकला आहात, तर तो आनंद तुम्हाला होत असतो. त्यामुळे, कैसे हराया… ही माझी आतमधून, मनातून आलेली स्टेटमेंट आहे. मात्र, याच गोष्टीला घेऊन बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे, असे म्हणत जात प्रमाणपत्राचे आरोप हे बिनबुडाचे असल्याचं सहर शेख यांनी स्पष्ट केलं.

वानखेडेवरील फोटोबाबतही स्पष्टीकरण

आमच्या गटनेत्यानं पत्रकारांना सांगितलं की, आमच्या कुटुंबातील व्यक्तीचं निधन झालं, पण दुसऱ्या दिवशी मी वानखेडे मैदानावर दिसले असा आरोप तुमच्याकडून केला जातो. मात्र, निधन झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी मी वानखेडे मैदानावर गेले असं गटनेत्यानं सांगितलं का? नाही. त्यामुळेच, सगळं कन्फूजन पसरवलं जात असल्याचंही सहर शेख यांनी सांगितलं.

हेही वाचा

राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल

आणखी वाचा

Comments are closed.