मोठी बातमी! कल्पना खरातचा अटकपूर्व जामीन फेटाळला; भोंदू अशोक खरातच्या पत्नीला अटक होणारच

अहिल्यानगर : नाशिकमधील महिला अत्याचारप्रकरणी अटकेत असलेल्या भोंदू अशोक खरातच्या पत्नीविरुद्धही शिर्डी पोलिसांत (Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका शेतकऱ्याच्या जमीन फसवणूक प्रकरणात अशोक खरातची पत्नी कल्पना खरातवार (कल्पना खरात जामीन) गुन्हा दाखल असून सध्या ती फरार आहे. मात्र, अटकपूर्व जामीनासाठी कल्पना खरातच्यावतीने अर्ज करण्यात आला होता. राहता येथील न्यायालयात आज सव्वातास याप्रकरणी झालेल्या युक्तिवादानंतर न्यायालयाने (Court) कल्पना खरातचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे.

कल्पना खरात 31 मार्चपासून फरार असून पोलिसांकडून तिचा शोध घेतला जात आहे, एसआयटीच्या पथकाने कल्पना खरातच्या नाशिकमधील काही जवळच्या मैत्रिणींची चौकशी केली. तसेच, खरातच्या घरी सध्या काम करणारे आणि यापूर्वी काम सोडून गेलेल्या नोकरांकडूनही माहिती घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. कल्पना नेमकी कोणाच्या संपर्कात होती किंवा ती कुठे आश्रय घेऊ शकते? या दिशेने पोलीस तपास करत आहेत.

कल्पना खरातच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज राहता येथील न्यायालयात सुनावणी झाला, त्यावर न्यायमूर्तींनी कल्पना खरातचा जामीन अर्ज फेटाळला आहे. तब्बल सव्वा तास युक्तिवाद चालला होता, आरोपीच्या वतीने प्रशांत गिरी यांनी युक्तिवाद केला. मात्र, सरकारी वकील व तपास अधिकाऱ्याने आरोपींच्या वकिलाचे मुद्दे खोडले. त्यावर, न्यायालयाने निर्णय दिल्याने कल्पना खरातच्या अडचणीत वाढ झाली असून शिर्डी पोलिसांसमोर कल्पना खरातच्या शोधाचे आव्हान आहे.

लुक आउट नोटीस जारी (कल्पना खरात लुकआउट नोटीस)

कल्पना खरातने शिर्डीत एका शेतकऱ्याची जमीन खरेदी प्रकरणात मोठी फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पैशांचे व्यवहार कल्पनाच्या भावांच्या खात्यातून झाल्याचेही तपासात समोर आले होते. त्यामुळे एसआयटीने काही दिवसांपूर्वी अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन आणि कल्पनाच्या दोन भावांची चौकशी केली होती. ती देशाबाहेर पळून जाऊ नये, यासाठी पोलिसांनी तिच्याविरोधात ‘लूकआऊट नोटीस’ जारी करण्यात आली आहे.

कल्पनाचे 1993 साली विवाह (Kalpana kharat marriage)

कल्पना खरातचे मूळ नाव सुनीता शिंदे आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पाडळी हे तिचे जन्मगाव. तिचे प्राथमिक शिक्षण पाडळी गावात सातवीपर्यंत झाले, तर माध्यमिक शिक्षण ठाणगाव येथील डॉ. अण्णासाहेब शिंदे कनिष्ठ महाविद्यालयात झाले. 1993 साली तिचा विवाह अशोक खरातशी झाला आणि सुनीता शिंदेची ‘कल्पना खरात’ झाली. दोन मुली आणि एक मुलगा असा तिचा परिवार असून, अशोक खरातच्या काळ्या साम्राज्यात तिची मोठी भागीदारी असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

हेही वाचा

Saudala sarpanch जिवंतपणीच कावळा शिवला, सरपंचाने पत्नी, लेकरासह दशक्रिया विधी उकरला; प्रतिज्ञापत्रही दिलं, पै पाहुणे अन् गावही जमलं

आणखी वाचा

Comments are closed.