Eyestrain: उन्हाळ्यात डोळे चुरचुरतायत? अशी घ्या योग्य काळजी




डोळ्यांचा ताण


उन्हाळा सुरू झाला की तापमान झपाट्याने वाढतं आणि त्याचा परिणाम आपल्या डोळ्यांवरही होतो. सध्या उन्हाची त्रीव्रता मोठ्या प्रमाणत वाढली आहे. घरातून बाहेर जाणंही कठीण झालं आहे. गरम वारे, धूळ आणि प्रदूषणामुळे डोळ्यांत जळजळ, आग होणे, लालसरपणा आणि कोरडेपणा अशा समस्या नागरिकांनी जाणवत आहेत. विशेषतः दुपारच्या कडक उन्हात बाहेर पडल्यावर हा त्रास अधिक वाढतो. त्यामुळे या दिवसांत डोळ्यांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे.(are your eyes stinging in summer take proper care of them)

काय काळजी घ्यावी ?
डोळ्यांना त्रास होत असेल तर काही सोपे उपाय उपयोगी ठरतात. वेळोवेळी थंड पाण्याने डोळे धुतल्याने त्यांना आराम मिळतो आणि धूळही निघून जाते. मोबाईल आणि संगणकाचा वापर थोडा कमी करून डोळ्यांना विश्रांती देणंही महत्त्वाचं आहे. तसेच, बाहेर पडताना चांगल्या दर्जाचे गॉगल्स वापरल्यास सूर्याच्या किरणांपासून आणि धुळीपासून डोळ्यांचं संरक्षण होतं.

याशिवाय, शक्यतो दुपारी 11 ते 4 या वेळेत बाहेर जाणं टाळावं. जर बाहेर जावंच लागलं, तर सावलीत राहण्याचा प्रयत्न करावा. दररोज पुरेशी झोप घेणंही तितकंच आवश्यक आहे, कारण झोप पूर्ण झाल्यास डोळ्यांचा थकवा कमी होतो. अशा छोट्या सवयी अंगीकारल्यास उन्हाळ्यातही डोळे निरोगी आणि ताजेतवाने राहू शकतात.



Comments are closed.